सरांडी येथे ‘वर्धिनी’ फेरीचा समाराेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:07+5:302021-03-13T04:13:07+5:30
भिवापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामसंघ संस्था व क्षमता बांधणी करण्यासाठी ग्रामपंचायत सरांडी येथे वरिष्ठ वर्धिनी फेरीचे ...

सरांडी येथे ‘वर्धिनी’ फेरीचा समाराेप
भिवापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामसंघ संस्था व क्षमता बांधणी करण्यासाठी ग्रामपंचायत सरांडी येथे वरिष्ठ वर्धिनी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विविध उपक्रम राबविल्यानंतर नुकताच या वर्धिनी फेरीचा समाराेप करण्यात आला.
कार्यक्रमाला सरपंच उमेश भोयर, उपसरपंच दुर्योधन महल्ले, ग्रामसेवक गणेश राऊत, तालुका व्यवस्थापक आरती तिमांडे, रवींद्र शेंडे आदी उपस्थित होते.
सरांडी येथे उमेद अभियानांतर्गत ११ महिला स्वयंसहाय्यता समूह असून, वर्धिनीमार्फत ११ महिला समूहाचा एक ग्रामसंघ तयार करण्यात आला. प्रत्येक गटातील अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांच्यामार्फत गट मूल्यमापन समिती, बँक जोडणी समिती, सूक्ष्म गुंतवणूक आराखडा समिती, सामाजिक समस्या मूल्यांकन समिती व संपादनूक समिती तयार करून त्यांचे क्षमताबांधणीचे काम वरिष्ठ वर्धिनींनी केले आहे. यासाठी वर्धा जिल्ह्यातून आलेल्या वरिष्ठ वर्धिनी कुमुदिनी चिंचोले, लीना भगत, सुलोचना तंबाखे यांचा ग्रामपंचायत सरांडीच्या वतीने समारोपीय कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. आरती तिमांडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. ग्रामसेवक गणेश राऊत यांनी आरोग्य, स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करीत, कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविड लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामसंघाच्या पदाधिकारी भारती नवघरे, दुर्गा तळणकर, सविता राऊत, वैशाली भोयर उपस्थित होत्या. संचालन संगीता राऊत यांनी तर आभार चिरंजित बुरांडे यांनी मानले.