सामूहिक पारायणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:10 IST2021-09-26T04:10:18+5:302021-09-26T04:10:18+5:30

रामटेक : शहरातील दमयंती नगर छोरीया लेआऊट येथे श्री गजानन महाराज भक्तांनी सामूहिक पारायणाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या ...

Conclusion of the collective parayana | सामूहिक पारायणाची सांगता

सामूहिक पारायणाची सांगता

रामटेक : शहरातील दमयंती नगर छोरीया लेआऊट येथे श्री गजानन महाराज भक्तांनी सामूहिक पारायणाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या पारायणाची शनिवारी (दि. २५) सांगता करण्यात आली.

यानिमित्त भाविकांनी स्वत: आकर्षक सजावट केली हाेती. परिसरातील ५० भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण केले. या कार्यक्रमात धनश्री रागमेलवार, सविता बावनथडे, आशा लेंडे, स्वाती वैद्य, भावना बोंगीरवार, आशालता काळे, अर्चना रामकेळकर, सारिका इटनकर, शोभा ठाकरे, सुलेशा महाजन, जयश्री माकडे, बरबटे, वाघाडे, ज्योती जांभूळकर, बारागवणे, मयूरी मलेवार, राधाबाई वैरागडे, नीलिमा डेकाटे यांच्यासह भाविक सहभागी झाले हाेते. वैष्णवी जांभुळकर, ॠतुजा ठाकरे, नेहा जांभुळकर यांना वाद्य वादनात वेदांत व पीयूष जांभूळकर यांनी साथ दिली.

Web Title: Conclusion of the collective parayana