शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मुलगी दिल्लीवरून आल्याची माहिती लपविली, वडील निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 8:39 PM

वेकोलि चनकापूर वसाहतीतील एका वेकोलि कर्मचाऱ्याची मुलगी दिल्लीवरून ८ जून रोजी विमानाने प्रवास करून चनकापूर येथे घरी परत आली. या दरम्यान संबंधित स्थानिक प्रशासनाला मुलीच्या वडिलांकडून माहिती देण्यात आली नाही. यानंतर या मुलीला कोरोनाची लागण झाली. यासंदर्भात प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर क्षेत्र महाव्यवस्थापक डी.एम. गोखले यांनी कोरोनाबाधित मुलीच्या वडिलांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचारी वकोलिच्या सिल्लेवाडा खाणीतील मायनिंग विभागात कार्यरत आहे.

ठळक मुद्देवेकोलिची कारवाई : कोरोनाचा झाला संसर्ग

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर (खापरखेडा) : वेकोलि चनकापूर वसाहतीतील एका वेकोलि कर्मचाऱ्याची मुलगी दिल्लीवरून ८ जून रोजी विमानाने प्रवास करून चनकापूर येथे घरी परत आली. या दरम्यान संबंधित स्थानिक प्रशासनाला मुलीच्या वडिलांकडून माहिती देण्यात आली नाही. यानंतर या मुलीला कोरोनाची लागण झाली. यासंदर्भात प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर क्षेत्र महाव्यवस्थापक डी.एम. गोखले यांनी कोरोनाबाधित मुलीच्या वडिलांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचारी वकोलिच्या सिल्लेवाडा खाणीतील मायनिंग विभागात कार्यरत आहे. चनकापूर वेकोलि बी-टाईप वसाहतीत राहणारी मुलगी दिल्ली येथे शिक्षणासाठी गेली होती असे सांगण्यात येत आहे. दिल्लीवरून घरी आल्यानंतर त्या मुलीला घरीच वेगळ्या रूममध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. पण मुलीच्या वडिलांनी स्थानिक प्रशासनापासून ही माहिती लपवून ठेवली. त्यांनी मुलीला घरीच ठेवले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलिस विभाग अथवा वेकोलि प्रशासनाला त्यांनी याबाबत अवगत केले नाही. यानंतर अचानक गत शुक्रवारी मुलीची तब्येत बिघडली असता तिला वलनीतील वेकोलिच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिची लक्षणे संशयित वाटताच लागलीच तिला रुग्णवाहिकेने नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये रवाना केले. दरम्यान, शनिवारी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती मिळताच वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी बी-टाईप वसाहतीत जाऊन पाहणी केली. एकीकडे स्थानिक प्रशासनाने या विषयाबाबत वेकोलिविरोधात नाराजी व्यक्त केली होती. याचा परिणाम म्हणून वेकोलिच्या महाव्यवस्थापकांनी मुलीच्या वडिलांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सदर कोरोनाबाधित युवतीमुळे वेकोलि वसाहतीतील राहणाऱ्या तिच्या संपर्कात आलेल्या व वेकोलि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWestern Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरEmployeeकर्मचारीsuspensionनिलंबन