ज्वेलर्सच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: February 11, 2016 03:29 IST2016-02-11T03:29:23+5:302016-02-11T03:29:23+5:30

दोन लाख रुपये आणि त्यावरील दागिने खरेदीवर पॅनकार्ड दाखविणे सक्तीचे केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध ...

Composite response to jewelers' bust | ज्वेलर्सच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

ज्वेलर्सच्या बंदला संमिश्र प्रतिसाद


नागपूर : दोन लाख रुपये आणि त्यावरील दागिने खरेदीवर पॅनकार्ड दाखविणे सक्तीचे केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध बुधवारी जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी आणि सोना चांदी ओळ कमेटीने पुकारलेल्या एक दिवसीय बंदला एका गटाने विरोध केल्याने संमिश्र प्रतिसाद मिळाला. या संदर्भात कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कमेटीच्या सदस्यांमध्ये फूट
मोठ्या शोरूम पूर्णत: बंद
कमेटीच्या बंदच्या निर्णयाला काही ज्वेलर्सने विरोध करीत दुकाने सुरू ठेवली. यामुळे कमेटीचे पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. पण वामन हरी पेठे, बटुकभाई, दास ज्वेलर्स, करण कोठारी ज्वेलर्स, तनिष्क, टीबीझेड, आसरे ज्वेलर्स आदींसह शहरांतील सर्व ब्रॅण्डेड आणि स्थानिकांच्या मोठ्या शोरूम बंद होत्या. इतवारी भागातील ज्वेलर्सची दुकाने सुरू असली तरीही वृत्तपत्रांमधील बंदच्या बातम्यांमुळे ग्राहक बाजारात फिरकला नाही. सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. बाजारात अनेकविध चर्चेला ऊत आला होता. विरोधी गटाने एकत्रितरीत्या ज्वेलर्सला दुकाने सुरू करण्यास भाग पाडल्याची चर्चा होती. काही ज्वेलर्सने दुपारी १ पर्यंत दुकाने बंद ठेवली होती. पण बाजूचे सुरू असल्याचे पाहून आम्हाही दुकान सुरू केल्याचे व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ग्रामीण भागात ज्वेलर्सची दुकाने बंद होती.
२० टक्के लोकांकडे पॅन कार्ड
नागपूर जिल्ह्यातील ज्वेलर्सची प्रमुख संघटना सोना चांदी ओळ कमेटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले की, कमेटीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण जिल्ह्यातील ब्रॅण्डेड आणि मोठ्या शोरूम पूर्णत: बंद होत्या. आता तर दोन लाखांच्या खरेदीवर सरकार पॅन कार्ड मागत आहे. पुढे ही अट ५० हजारांवर येण्याची शक्यता आहे. अर्थात ५० हजाराचे सोने खरेदी करणाऱ्यांना कराच्या टप्प्यात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
देशात केवळ २० टक्के लोकांकडे पॅन कार्ड आहेत. आधार कार्डप्रमाणे किंवा किमान ५० टक्के लोकांना पॅन कार्डचे वाटप केल्यानंतरच सरकारने उपरोक्त धोरणाची अंमलबजावणी करावी. बंद आंदोलनासाठी अशोक वस्तानी, राजेंद्र सेठ, प्रदीप कोठारी, राजेश रोकडे, अनुप उदापुरे, श्रीकांत भांडारकर आदींसह अन्य ज्वेलर्सने परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)

Web Title: Composite response to jewelers' bust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.