शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

उपराजधानीत ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:33 IST

राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तान्हा पोळा व मारबत मिरवणूक यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ दुपारपर्यंत बंदच होती. परंतु शहरातील इतर भागात विविध ठिकाणी निदर्शनांच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा विरोध करण्यात आला. अनेक ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सरकारी धोरणांचा निषेध केला. सकाळी ११ नंतर शहरातील अनेक चौकांमध्ये निदर्शने करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी यावेळी प्रतिकात्मक रथयात्रा काढत बंदमध्ये सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देविरोधकांकडून ठिकठिकाणी निदर्शनेअनेक ठिकाणी बाजारपेठा बंद, शांततामय पद्धतीने इंधनवाढीचा निषेधशहर बससेवा प्रभावित, तीन बसेस फोडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तान्हा पोळा व मारबत मिरवणूक यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ दुपारपर्यंत बंदच होती. परंतु शहरातील इतर भागात विविध ठिकाणी निदर्शनांच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा विरोध करण्यात आला. अनेक ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सरकारी धोरणांचा निषेध केला.सकाळी ११ नंतर शहरातील अनेक चौकांमध्ये निदर्शने करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी यावेळी प्रतिकात्मक रथयात्रा काढत बंदमध्ये सहभाग नोंदविला. शिवाय व्यापाऱ्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, अ.भा. कॉंग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सकाळच्या सुमारास पदयात्रा काढण्यात आली.शहरातील आॅटोचालक संघटनादेखील बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरात बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून आला नाही. शहरात जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.अनेक पेट्रोल पंप बंददरम्यान, शहरातील पेट्रोल पंपवर बंदचा परिणाम दिसून आला. सकाळच्या सुमारास शहरातील सर्वच पेट्रोल पंप सुरू होते. मात्र दुपारनंतर बरेच पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले. दक्षिण नागपूर, उत्तर नागपूर व मध्य नागपुरात सर्वात जास्त पेट्रोल पंप बंद होते.प्रतिकात्मक रथाच्या माध्यमातून निषेधपूर्व नागपुरात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात प्रतिकात्मक रथाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. इंधनवाढीमुळे जनता बेजार झाली असून पुर्वीप्रमाणे घोडागाडी, सायकलवर जाण्याची वेळ आली आहे, अशी लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली.‘सपा’तर्फे निदर्शनेभारत बंद’मध्ये समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते. इंदोरा, मानकापूर, अनंतनगर, गिट्टीखदान इत्यादी भागात कार्यकर्त्यांनी व्यापाºयांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तसेच सरकारविरोधात निदर्शने केली. विदर्भ प्रमुख अफजल फारुक यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात जंगबहादुर यादव, एस.बी. अहमद, शकील अहमद, आदर्श सिंह ठाकूर, शकील सलमान, शमीम भाई, कलाम भाई, इमरान खान, रवी चौहान, अजीम पटेल, हरीश भाई, नवेद शेख, सूरज काळे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.राष्ट्रवादी काँग्रेसदेखील बंदमध्ये सक्रिय‘भारत बंद’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचादेखील उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आ.प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपुरात निदर्शने करण्यात आली. रविनगर चौक, रामनगर चौक, शंकरनगर चौक, लॉ कॉलेज चौक, बर्डी, वाडी इत्यादी भागात फिरून कार्यकर्त्यांनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले. भाजपा-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि अपराध वाढले आहेत, असा आरोप यावेळी गजभिये यांनी केला. यावेळी संतोष नरवाडे, शोएब असद, विजय गजभिये, अब्दुल शाहिद, गौरव शाहू, पंकज बोंद्रे, हर्षद बोंद्रे, दत्ताजी वानखेड़े, ईश्वर चव्हाण, सुनील सेलोकर, अजय मेश्राम, भूपेंद्र सनेश्वर इत्यादी मोठ्या संख्येत सहभागी होते.पूर्व नागपूरपूर्व नागपुरात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. सोबतच अनेक कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंप, दुकाने, शोरुम बंद करण्याची व्यावसायिक प्रतिष्ठानांना विनंती केली. वर्धमान नगरात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘बाईक रॅली’ काढून ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचे व्यापाºयांना आवाहन केले. कॉंग्रेसचे उमाकांत अग्निहोत्री व राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात ही ‘बाईक रॅली’ निघाली. वर्धमाननगरातून सुरू झालेली ही ‘रॅली’ आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज चौक, सुभाष पुतळा चौक, छापरूनगर, नेहरूनगर, एचबी टाऊन, पारडी, देशपांडे ले- आऊट या मार्गाने गेली व हिवरीनगरात समापन झाले.‘रॅली’त एम.एम.शर्मा, केदार साहू, नेमीचंद सनोडिया, पुरुषोत्तम लोणारे, नीलेश धरमठोक, जीतू साहू, बबलू टेकाम, छोटू भगत, शेख एहफाज, राजेश जिराफे, लालचंद हिरवानी, अविनाश साहू, किशन बघेल, हरीश रामटेके इत्यादी सहभागी झाले होते. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वातदेखील कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. सकाळी ९.३० वाजताच सेंट्रल एव्हेन्यू, टेलिफोन एक्स्चेंज चौक, नंदनवन, जगनाडे चौक, सतरंजीपुरा, दहीबाजार पूल, शांतीनगर, कळमना, गुलमोहर नगर, पारडी, देशपांडे ले आऊट, वर्धमाननगर इत्यादी भागांमध्ये फिरून कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच सरकारविरोधात निदर्शने केली.पश्चिम नागपूरपश्चिम नागपुरात विविध ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेतर्फे विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. रामनगर, धरमपेठ परिसरात काँग्रेसतर्फे पदयात्रा काढण्यात आली. यात काँग्रेसचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. गोकुळपेठ, धरमपेठ परिसरात मनसेतर्फे निदर्शने करण्यात आली. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, प्रशांत निकम, घनशाम निखाडे पिंटू बिसेन, शशांक गिरडे, महेश माने, महेश जोशी, मंदार वैद्य,मनीषा पापडकर, आदित्य दुरुगकर, सुधीर बोरीकर, नितीन कुरंजेकर, रोहित कडू पाटील,योगेश सोनावणे, अभय व्यवहारे, राजेंद्र पुराणिक, राजू पत्राळे, गौरव पुरी, शुभम पिंपळापुरे, निखिल झाडे, अक्षय दहीकर, दुर्गेश साकुळकर, सुनील गवई, श्याम रहांगडाले, लाला ससाणे, पवन कोलते, मोहित देसाई,अभिषेक माहुरे, प्रवीण बावणे आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीदेखील पश्चिम नागपुरात अनेक ठिकाणी निदर्शने केली.तीन बसेस फोडल्याभारत बंदचा परिणाम शहर बससेवेवरही दिसून आला. आंदोनकर्त्यांनी तीन बसेसच्या काचा फोडल्या. ठिकठिकाणी बसेस रोखण्यात आल्या. परिणामी शहर बस सेवा दिवसभर विस्कळीत राहिली. सकाळी बसेस सुरू होण्यापूर्वीच आंदोनलकर्ते बस डेपोमध्ये पोहोचले आणि बसेस रोखून धरल्या.मनपा परिवहन विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार शंकरनगर चौक आणि हिंगणा रोडवर दोन बसेसच्या काच्या फोडण्यात आल्या. तसेच तात्या टोपेनर, गोधनी, पारडी, मोरभवन, भांडेवाडी येथे बसेस रोखण्यात आल्या. आंदोनकर्ते सकाळी ८ वाजताच पटवर्धन मैदान आणि हिंगणा येथील डेपोमध्ये पोहोचले आणि त्यांनी बसेस रस्त्यावर येऊच दिल्या नाही.शहरात सध्या ३०६ बसेस संचालित होतात. परंतु तान्हा पोळाच्या पार्श्वभूमीवर फारशी गर्दी नसल्याने कमी बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. बर्डी, संविधान चौक, महाराजबाग आदी परिसरात आंदोलनकर्त्यांनी प्रचंड गर्दी होती. यामुळे मोरभवन येथूनच काही बसेस परत पाठवण्यात आल्या. पोलिसांनीही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुपारपर्यंत बसफेºया कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. बसेसची तोडफोड आणि रोखले जात असल्याच्या बातम्या येताच बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. सायंकाळी काही मार्गावर बस चालवण्यात आल्याची माहिती आहे.परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले की, तीन बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. अनेक ठिकाणी बसेस रोखून धरल्या गेल्या. त्यामुळे बससेवा दुपारी बंद करण्यात आली होती. ३.३० वाजतानंतर काही मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली. ४५ बसेस सुरू होत्या. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदnagpurनागपूर