शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

टार्गेट पूर्ण करा अन्यथा कारवाईसाठी तयार राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:30 IST

मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत संपत्ती कर आहे. परंतु मनपाला यातूनच पर्याप्त उत्पन्न होताना दिसून येत नाही. एप्रिलपासून आॅगस्टपर्यंत मनपाला संपत्ती करातून केवळ ६१.१७ कोटीची कमाई झाली. स्थायी समितीने एकूण टार्गेट असलेल्या ५०९ कोटीपैकी ४० टक्के म्हणजे २०३.६० कोटी रुपयाची वसुली सप्टेंबर शेवटपर्यंत करण्याचे टार्गेट प्रशासनला दिले आहे. सप्टेंबर शेवटपर्यंच टार्गेट पूर्ण न केल्यास झोन व संपत्ती कर विभागाच्या सहायक आयुक्तांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिला आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र कुकरेजा : मनपा संपत्ती कर विभागाला दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क :नागपूर : मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत संपत्ती कर आहे. परंतु मनपाला यातूनच पर्याप्त उत्पन्न होताना दिसून येत नाही. एप्रिलपासून आॅगस्टपर्यंत मनपाला संपत्ती करातून केवळ ६१.१७ कोटीची कमाई झाली. स्थायी समितीने एकूण टार्गेट असलेल्या ५०९ कोटीपैकी ४० टक्के म्हणजे २०३.६० कोटी रुपयाची वसुली सप्टेंबर शेवटपर्यंत करण्याचे टार्गेट प्रशासनला दिले आहे. सप्टेंबर शेवटपर्यंच टार्गेट पूर्ण न केल्यास झोन व संपत्ती कर विभागाच्या सहायक आयुक्तांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिला आहे.कर वसुलीचा आढावा घेतल्यानंतर कुकरेजा यांनी पत्रकारांना सांगितले की, वित्त वर्ष सुरु होऊन पहिल्या तीन महिन्यात २०-२० टक्के वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. अशा प्रकारे डिसेंबरपर्यंत ६० टक्के वसुलीचे उद्दिष्ट आहे. जानेवरी ते मार्चपर्यंत संपत्ती कराची मुख्य वसुली होत असते. त्यामुळे या दरम्यान ४० टक्के वसुलीचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.६.५० पासून ते ७ लाखापर्यंतच्या संपत्ती कराच्या यादीत येण्याची शक्यता आहे. तसेच करासंबंधी नवीन फॉर्म्युलाही लागू झाला आहे. त्यामुळे दिलेले टार्गेट योग्य असून ते वसूल करणे शक्य आहे. कुकरेजा यांच्यानुसार प्रत्येक तीन महिन्याच्या आधारावर वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु त्यानुसार विभाग काम करीत नाही आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीत कडक ताकीद देण्यात आली. यानंतरही अधिकारी-कर्मचारी न मानल्यास कारवाई निश्चित आहे.बैठकीदरम्यान कर विभागाने कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगितले. यावर स्थायी समितीतर्फे आयुक्तांना रिपोर्ट देण्याचे निर्देश देण्यात आले.३० टक्केच डिमांड वाटले, ४० टक्के वसुलीचे टार्गेटसध्या सहा लाख संपत्तीकडून कर वसूल केले जातात. यात आणखी काही संपत्ती जुळण्याची शक्यता आहे. यात ४.२० लाख डिमांड जनरेट झाले आहेत. तर २.८१ लाख डिमांड वितरित झाले आहेत. यातून हे स्पष्ट दिसून येते की, ३० टक्केपेक्षाही कमी डिमांड नोट वाटण्यात आले आहे. असे असताना ४० टक्के वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. यावर कुकरेजा यांनी सांगितले की, ३० सप्टेंबरपर्यंत ५ लाख डिमांड वाटण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ५.२८ लाख संपत्तीचे असेसमेंट झाले आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व संपत्तीचे सर्वे करून डिमांड जारी करण्यात येतील.बाजारातील अतिक्रमण महिनाभरात तुटतीलरेडिरेकनरच्या आधारावर मनपाच्या ६४ बाजारातील ५५०० संपत्तींचे डिमांड नोट जारी केले जात आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे भाडे वाढलेले नाही. कुकरेजा यांनी सांगितले की, नवीन धोरणाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण २५.५० कोटी रुपयाचे डिमांड बजार विभागाकडून जारी केले जातील तर १२.५० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य आहे. ते पूर्ण केले जाईल. बाजारात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्याला महिनाभरात तोडण्याचे निर्देशही देण्यात आले.एलबीटीतून २२.६१ कोटीची वसुलीएलबीटीच्या जुन्या प्रकरणातून ७५ कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यापैकी २२.६१ कोटी रुपये मनपाच्या एलबीटी विभागाला प्राप्त झाले आहेत. त्याचप्रकारे मनपाच्या स्थापत्य विभागाच्या अंतर्गत येणाºया संपत्तीचा संगणकीकृत डाटा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विभागाचे टार्गेट १७ कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. यात २.३० कोटी रुपयाची वसुली झालेली आहे. कंजरवेंसी लेनचे धोरणही तयार झाले आहे. या आधारावर कारवाई सुरू केली जाईल.डिमांड न भरणाऱ्यांवर कारवाईमनपाच्या नगररचना विभागात २७५ प्रकरणे आली आहेत. यापैकी ९७ प्रकरणांचा निपटारा झालेला आहे. १५९ प्रकरणांना रिजेक्ट करण्यात आले आहे. विभागाकडून ३०.१८ कोटी रुपयाचे डिमांड चारी करण्यात आले आहे. यापैकी १२.९२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित रकमेची वसुली थकीत आहे. संबंधित प्रकरणात विभागाच्या नियमानुसार डिमांड न भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. ६ सप्टेंबर रोजी नगररचना विभागाची बैठक बोलावण्यात आली आहे. यात कंपाऊंडींगच्या विषयावर चर्चा होईल.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर