पाच पिल्लरचे बांधकाम पूर्ण

By Admin | Updated: June 8, 2016 02:21 IST2016-06-08T02:21:31+5:302016-06-08T02:21:31+5:30

मेट्रो रेल्वेसाठी पिल्लर (खांब) उभारणीचे काम वेगात सुरू असून वर्धा रोडवर पाचचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सहाव्या

Complete the construction of five Pillar | पाच पिल्लरचे बांधकाम पूर्ण

पाच पिल्लरचे बांधकाम पूर्ण

नागपूर : मेट्रो रेल्वेसाठी पिल्लर (खांब) उभारणीचे काम वेगात सुरू असून वर्धा रोडवर पाचचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सहाव्या पिल्लरचे काम मेयो हॉस्पिटलजवळ काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे.
मेयो हॉस्पिटलपासून संत्रामार्केटकडे वळणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या मार्गावर आठ पिल्लर उभारण्यात येणार आहे. या कामासाठी साधारणत: तीन महिने लागणार आहे. पहिल्याचे बांधकाम सुरू झाले आहे. आठही पिल्लर तीन महिन्यात उभे राहतील. याशिवाय रामझुल्याच्या बांधकामाला अडथळा येऊ नये म्हणून दोन्ही बाजूला अ‍ॅप्रोच रोडचे बांधकाम सुरुवातीलाच नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड करणार आहे.
रामझुल्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करीत आहे. या मार्गाचे डिझाईन वेगळे असल्यामुळे पिल्लरची उंची साधारत: जास्त राहील. मेट्रो रेल्वे रामझुल्यापासून संत्रामार्केटकडे वळणार असल्यामुळे दोन पिल्लरमधील अंतर पाच ते सहा मीटर आणि काही ठिकाणी सात मीटर राहणार आहे. (प्रतिनिधी)

चार गर्डर तयार
दोन पिल्लरमध्ये टाकण्यात येणाऱ्या गर्डरच्या कास्टिंगचे काम वेगात सुरू असून चार गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी निविदा निघाल्या आहेत. पिल्लरवर टाकण्यात येणाऱ्या गर्डर निर्मितीचा प्रकल्प वर्धा रोडवर जामठ्याजवळ २२ एकरमध्ये आहे. गर्डरचे कास्टिंग करताना ३५ डिग्रीपर्यंत तापमान हवे असते. पण उन्हाळ्यात तापमान ४५ डिग्रीपर्यंत गेल्यामुळे काही दिवस काम थांबले होते. दोन पिल्लरमध्ये पूर्वीच तयार झालेले गर्डर क्रेनच्या साह्याने बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेच्या बचतीसह नवीन तंत्रज्ञानाने पुलाचे काम अधिक मजबूत आणि वेगाने होणार आहे. उन्हाळ्यामुळे गर्डर निर्मिती संथगतीने सुरू असली तरीही दरदिवशी चार गर्डर तयार करण्याची प्रकल्पाची क्षमता आहे. पुलासाठी एकूण २,३९० गर्डरची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पात क्राँक्रिट तयार करण्यासाठी मोठे युनिट आहे. शहरात काम करताना सुरक्षा आणि वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून सेगमेंटल प्री-कास्ट बॉक्स गर्डर सर्वोत्तम आहे. एवढ्या मोठ्या आकाराच्या बॉक्सला साईटवर तयार करणे कठीण आहे. तयार गर्डर निश्चित अंतरावर बसविण्यात येणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (पीआरओ व समन्वयक) आपटे यांनी लोकमतला दिली.

Web Title: Complete the construction of five Pillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.