आरटीईअंतर्गत १० निकष पूर्ण करा
By Admin | Updated: January 3, 2015 02:34 IST2015-01-03T02:34:30+5:302015-01-03T02:34:30+5:30
बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत शाळांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

आरटीईअंतर्गत १० निकष पूर्ण करा
नागपूर : बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत शाळांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबतचे १० निकष पूर्ण करण्याबाबत १३४ शाळांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्र दिले आहे.
आरटीईनुसार सुविधा आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात आली होती. यात अनेक शाळांत भौतिक सुविधा नसल्याचे निदर्शनास आले होते.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता ज्या शाळांत अशा सुविधा नाही, त्यांना त्या उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात संबंधित शाळांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
ज्या शाळांना या आशयाचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमांच्याही काही शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या या पत्रामुळे शाळा संचालकांत खळबळ उडाली आहे. काही संघटनांनी या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)