शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:53 IST

महिला रेडिओ जॉकी (वय ३३) सोबत चॅटिंग करून तिला व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्याविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देचॅटिंग करून व्हिडीओ कॉलची मागणीचॅटिंगचा स्क्रीन शॉट सोशल मिडियावर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला रेडिओ जॉकी (वय ३३) सोबत चॅटिंग करून तिला व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्याविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.बागुल वाहतूक शाखेत प्रभारी सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहे. तक्रार करणारी तरुणी रेडिओ जॉकी म्हणून नागपुरात काम करते. कार्यालयीन कामाच्या निमित्ताने तिने बागुल यांना बुधवारी दुपारी १२.२२ वाजता मेसेज करून डीसीपी ट्रॅफिकचा नंबर मागितला होता. बागुल यांनी तिच्याशी चॅटिंग करताना तिला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. तिने कशासाठी विचारले असता तुझा सुंदर चेहरा बघायचा आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे तरुणी संतप्त झाली. तिने आपल्या फेसकबुकवर बागुल यांच्यासोबत झालेली चॅटिंग स्क्रीन शॉटच्या रुपाने शेअर केली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. फेसबुक फ्रेण्ड, नेटीझन्सने या तरुणीच्या शेअर चॅटवर संतप्त प्रतिक्रिया नोंदवून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, बागुल यांच्यासोबतची चॅट सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर तरुणीने बुधवारी रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. काही जणांनी तिला तक्रार परत घेण्यासाठी विनवणी केली तर काहींनी तिच्यावर दडपण आणण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिने दाद दिली नाही. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर या संबंधाने गंभीर चर्चा झाली. त्यानंतर बागुल यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर, उशिरा रात्री बागुल यांच्याविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात विनयभंगाच्या आरोपाखाली कलम ३५४ (अ) आणि ३५४ (ड)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस दलात खळबळया घडामोडीमुळ पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या संबंधाने कडक कारवाईच्या उपाययोजन आखल्या असून, कडक कारवाईचे निर्देश दिले आहे. दुसरीकडे गेल्या महिनाभराच्या कालावधीत दोन पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा तर आता एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे सर्वसामान्यांमध्येही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग