लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज दर कमी करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पक्षाचे म्हणणे आहे की, शिवसेनेने आपल्या निवडणुकीतील जाहिरनाम्यात ३०० युुनिटपर्यंत वीज दर ३० टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आता शिवसेनेचेच मुख्यमंत्री आहेत. परंतु आश्वासन पूर्ण झालेले नाही. उलट १ एप्रिलपासून वाढीव दर लागू करण्यात आले आहेत.आपतर्फे शुक्रवारी शहरातील २५ पोलीस ठाण्यात देवेंद्र वानखेडे, जगजीत सिंह, अशोक मिश्रा, कविता सिंघल, शंकर इंगोले व भूषण ढाकुलकर यांच्या नेतृत्वात तक्रार दाखल करण्यात आली. दक्षिण-पचिम नागपुरात विधानसभा संयोजक अजय धर्मे, दक्षिण नागपुरात सचिन पारधी, उत्तर नागपुरात रोशन डोंगरे, पश्चिम नागपुरात आकाश कावळे, मध्य नागपुरात लक्ष्मीकांत दांडेकर आणि पूर्व नागपुरात राकेश उराडे यांच्या नेतृत्वात तक्रार करण्यात आली.
वीज दर कमी न झाल्याने पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:29 IST
power tariff, police, Complaint वीज दर कमी करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली.
वीज दर कमी न झाल्याने पोलिसात तक्रार
ठळक मुद्देआपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा