ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:48+5:302021-02-05T04:44:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीजबिल दिलाशासंदर्भात आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला ...

Complaint lodged against Energy Minister Nitin Raut | ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीजबिल दिलाशासंदर्भात आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्र्यांसह महावितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत शहरातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

ऊर्जामंत्र्यांनी सातत्याने खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. अगोदर दिलेला शब्द फिरवत वीज ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नसून वीजबिल भरावेच लागेल, असे राज्यातील नागरिकांचा विश्वासघात आणि फसवणूक करणारे वक्तव्य केले. आता थकीत देयके असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. यामुळे जनतेला मनस्ताप झाला आहे, असा आरोप मनसेने केला. सीताबर्डी पोलिस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर व सतीश कोल्हे यांनी केली. यावेळी आदित्य दुरुगकर, संगीता सोनटक्के, घनश्याम निखाडे, चंदू लांडे, उमेश बोरकर, उमेश उत्तखेडे, महेश माने, राहुल अलोने, पराग विरखरे, प्रकाश ढोके, तुषार गिरे, सागर नान्हे, लोकेश कामडी, वामन इंगोले उपस्थित होते.

Web Title: Complaint lodged against Energy Minister Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.