महापालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 31, 2016 02:16 IST2016-08-31T02:16:01+5:302016-08-31T02:16:01+5:30
चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे उघड करण्यास महापालिका

महापालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
नागपूर : चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे उघड करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने गिट्टीखदान पोलिसांनी महापालिकेच्या अनामिक अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महापलिका प्रशासनाने दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरूच ठेवल्यास पुढच्या काही दिवसात गंभीर दखल घेण्याची तयारी पोलीस प्रशासनाने चालवली आहे.
प्रकरण पाच महिन्यांपूर्वीचे आहे. गिट्टीखदानमधील मानवसेवानगरात (पशु वैद्यकीय महाविद्यालय) राहणारा गुरफान अली अकबर अली (वय ८ वर्षे) हा बालक १५ मार्चला सायकल चालवित होता. रस्त्याच्या मध्ये असलेल्या आणि झाकण नसलेल्या गटारात (सेफ्टी टँक) पडून गुरफानचा करुण अंत झाला. या घटनेने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या हलगर्जीपणाचा निषेध नोंदवत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी रेटली होती. जनभावना तीव्र झाल्याचे पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)