सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 20:56 IST2018-02-28T20:56:13+5:302018-02-28T20:56:26+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्ध माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्ध तक्रार
ठळक मुद्देभारतीय सैन्याबाबत मानहानीकारक वक्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्ध माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. ११ फेब्रुवारी २०१८ रोजी बिहार येथे एका कार्यक्रमात बोलताना भारतीय सैन्याबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्यामुळे भागवत यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १२१ व ५०५ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात यावा अशी मून यांची विनंती आहे. सीताबर्डी पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्यामुळे ते न्यायालयात आले आहेत.