मोदी, सरसंघचालकांना धमकी देणाऱ्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:39+5:302021-02-05T04:44:39+5:30

नागपूर : ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना धमकी देणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात ...

Complaint against Modi, who threatened Sarsanghchalak | मोदी, सरसंघचालकांना धमकी देणाऱ्याविरोधात तक्रार

मोदी, सरसंघचालकांना धमकी देणाऱ्याविरोधात तक्रार

नागपूर : ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना धमकी देणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार समाजामध्ये तेढ व अस्थिरता निर्माण करणारा आहे, असा आरोप करत भाजयुमोच्या नागपूर महानगरतर्फे कोतवाली पोलीस ठाण्यात अरुण वानकर नामक इसमाविरोधात तक्रार करण्यात आली. यावेळी सचिन करारे व दीपांशू लिंगायत यांच्यासह बादल राऊत, यश सातपुते, सनी राऊत, आलोक पांडे, रितेश रहाटे, जय साजवाणी, राकेश भोयर, करण यादव, अंकुर थेरे, मनमित पिल्लारे, अथर्व त्रिवेदी, अक्षय ठवकर, सागर गंधर्व, संकेत कुकडे, प्रभात अवथनकर, हर्षल अपगडे, छोटू मांडले, मोनू माने, पवन खंडेलवाल, रितेश पांडे, रशीद शेख, यश पांडे उपस्थित होते

Web Title: Complaint against Modi, who threatened Sarsanghchalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.