अवैध दारू विरुद्धची तक्रार व्हॉट्सअॅपवरही
By Admin | Updated: September 16, 2016 03:12 IST2016-09-16T03:12:04+5:302016-09-16T03:12:04+5:30
अवैध दारूबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु आता नागरिकांना अशा अवैध दारूसंदर्भात व्हॉट्सअॅपवर

अवैध दारू विरुद्धची तक्रार व्हॉट्सअॅपवरही
नागपूर : अवैध दारूबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु आता नागरिकांना अशा अवैध दारूसंदर्भात व्हॉट्सअॅपवर तक्रार करता येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना अवैध दारूबाबत (परराज्यातील मद्य, हातभट्टी दारू, अवैध दारू, बनावट दारू, हातभट्टी दारू निर्मिती केंद्रे तसेच विक्री केंद्र याबाबत) नागरिकांना तक्रार नोंदविता यावी याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८४२२००११३३ व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे, असे असे आवाहन नागपूर राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्वाती काकडे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)