तक्रार आहे, फोटो काढा अन् पाठवा !
By Admin | Updated: September 2, 2014 01:14 IST2014-09-02T01:14:44+5:302014-09-02T01:14:44+5:30
शहरात कोणत्याही भागातील समस्या नजरेस आली तर तुम्ही यासंदर्भात महापालिका प्रशासनाला माहिती देऊ शकता. यासाठी गुगलच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन एनएमसी आॅन मोबाईल नावाने अर्ज डाऊनलोड

तक्रार आहे, फोटो काढा अन् पाठवा !
मोबाईल तक्रार यंत्रणा : महापौरांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर : शहरात कोणत्याही भागातील समस्या नजरेस आली तर तुम्ही यासंदर्भात महापालिका प्रशासनाला माहिती देऊ शकता. यासाठी गुगलच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन एनएमसी आॅन मोबाईल नावाने अर्ज डाऊ नलोड करायचा. त्यानंतर मोबाईलमध्ये फोटो घेऊन तक्र ार निवारण पर्यायाच्या माध्यमातून पाठवा. शिवाय मनपाच्या ई-प्रशासन यंत्रणेशी मोबाईलद्वारे संपर्क साधता येईल. परंतु यासाठी तक्र ारकर्त्याकडे स्मार्ट फ ोन वा अॅन्ड्रॉईड फोन असायला हवा.महापौर अनिल सोले यांनी सोमवारी मोबाईल तक्रार यंत्रणेचे लोकार्पण केले. याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, आयुक्त श्याम वर्धने, रमेश सिंगारे, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते.
याबाबतच्या तक्र ारकर्त्याला तक्र ार निवारणासंदर्भात प्रशासनाने काय कार्यवाही केली, याची माहिती यंत्रणेच्या माध्यमातून जाणून घेता येईल.
यासाठी ई-प्रशासन यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा नागरिकांना लाभ घेता येईल. तसेच मोबाईलच्या माध्यमातून एलबीटी, संपत्तीकर भरण्याची सुविधा आहे. तसेच जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, रुग्णालयाचा परवाना, वेबपोर्टल, माहिती अधिकार यासह मनपाच्या विविध विभागाची माहिती मिळण्याची सुविधा आहे. (प्रतिनिधी)