शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

देशातील अन्य मेट्रोच्या तुलनेत नागपूर मेट्रोने केला रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 22:29 IST

देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने पहिला टप्पा कमी वेळेत पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे. नागपूर मेट्रोचा पायाभरणी समारंभ ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता, तर पहिल्या टप्प्यात खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३.५ कि़मी. नागपूर मेट्रोचे उद्घाटन ७ मार्च २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून झाले. पायाभरणी ते उद्घाटन या कालावधीसाठी साडेचार वर्षे लागली. पण प्रत्यक्ष बांधकाम वर्धा रोड विमानतळाजवळ ४ डिसेंबर २०१५ पासून सुरू झाले. तेव्हापासून साडेतीन वर्षांत महामेट्रोने १३.५ कि़मी.चे बांधकाम पूर्ण करून नागपूरकरांसाठी व्यावसायिक प्रवास सुरू केला.

ठळक मुद्देसाडेतीन वर्षांत व्यावसायिक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने पहिला टप्पा कमी वेळेत पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे. नागपूर मेट्रोचा पायाभरणी समारंभ ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता, तर पहिल्या टप्प्यात खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३.५ कि़मी. नागपूर मेट्रोचे उद्घाटन ७ मार्च २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून झाले. पायाभरणी ते उद्घाटन या कालावधीसाठी साडेचार वर्षे लागली. पण प्रत्यक्ष बांधकाम वर्धा रोड विमानतळाजवळ ४ डिसेंबर २०१५ पासून सुरू झाले. तेव्हापासून साडेतीन वर्षांत महामेट्रोने १३.५ कि़मी.चे बांधकाम पूर्ण करून नागपूरकरांसाठी व्यावसायिक प्रवास सुरू केला.मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी केली डॉ. बृजेश दीक्षित यांची प्रशंसाउद्घाटनप्रसंगी गडकरी म्हणाले, डॉ. बृजेश दीक्षित हे रेल्वेशी संबंधित आहेत. मला रेल्वेचा वाईट अनुभव आहे. काम कसे होईल, यावर संशय होता. पण दीक्षित यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून १३.५ कि़मी. पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्यांच्या परिश्रमाचे हे फळ असून उद्घाटनासाठी एकत्र जमलो आहोत, असे सांगून त्यांनी दीक्षित यांची प्रशंसा केली. देशातील अन्य मेट्रोच्या तुलनेत नागपूर मेट्रोचे डिझाईन इनोव्हेटिव्ह आहे. याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री यांनी कमी वेळात कार्यान्वित झालेला नागपूर मेट्रो प्रकल्प दीक्षित यांच्यामुळे प्रत्यक्षात आल्याचे सांगून, त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.नागपूर मेट्रो प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • २१ ऑगस्ट २०१४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ.
  • २१ मार्च २०१५ : महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाची वेबसाईट दाखल आणि लोगोचे उद्घाटन.
  • ४ डिसेंबर २०१५ : वर्धा रोड विमानतळाजवळ बांधकामाला सुरुवात.
  • १८ फेब्रुवारी २०१६ : महामेट्रो नागपूरचा पहिला स्थापना दिन.
  • १० एप्रिल २०१६ : जर्मन डेव्हलपमेंट बँक केएफडब्ल्यू आणि महामेट्रो नागपूर यांच्यात ३७५० कोटींच्या कर्जासाठी करार.
  • १६ एप्रिल २०१६ : मेट्रोचा पहिला पिल्लरचे बांधकाम पूर्ण.
  • ८ ऑगस्ट २०१६ : उत्तर-दक्षिण मार्गावर व्हायाडक्टचा पहिला गर्डर लॉन्च.
  • १२ ऑगस्ट २०१६ : खापरी मेट्रो स्टेशनचे भूमिपूजन.
  • २ सप्टेंबर २०१६ : न्यू एअरपोर्ट स्टेशनचे भूमिपूजन.
  • १७ नोव्हेंबर २०१६ : फ्रान्सच्या एफडी आणि महामेट्रो नागपूरमध्ये १३० दशलक्ष युरो कर्जासाठी करार.
  • २३ जानेवारी २०१७ : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. असे पुनर्गठन.
  • १ जून २०१७ : रशिया येथून रूळाचे आगमन.
  • २ ऑगस्ट २०१७ : तीन कोचेसच्या पहिल्या मेट्रो रेल्वेचे नागपुरात आगमन.
  • १६ जानेवारी २०१८ : सीएमआरएस चमूतर्फे प्रकल्पाची पाहणी.
  • १८ फेब्रुवारी २०१८ : महामेट्रोचा तिसरा स्थापन दिन.
  • १८ एप्रिल २०१८ : एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवासासाठी सीएमआरएसची हिरवी झेंडी.
  • २१ एप्रिल २०१८ : दिव्यांग, मुले, वरिष्ठ नागरिक व फिल्मस्टारकरिता पहिली जॉय राईड.
  • २१ मे २०१८ : जॉय राईड करणाऱ्यांची संख्या २५००.
  • २३ जून २०१८ : आमदार आणि प्रतिनिधींसाठी जॉय राईड.
  • १२ सप्टेंबर २०१८ : महामेट्रोतर्फे एअरपोर्ट साऊथ ते खापरी अ‍ॅटग्रेड सेक्शनमध्ये ऑसिलेशन ट्रायल.
  • ७ ऑक्टोबर २०१८ : जामठा कास्टिंग यार्डमध्ये अखेरचा २७३६ वा सेगमेंट तयार.
  • २८ डिसेंबर २०१८ : आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांसाठी जॉय राईड.
  • १५ जानेवारी २०१९ : चीन येथून तीन कोचेसच्या रेल्वेचे खापरी येथे आगमन.
  • ३१ जानेवारी २०१९ : महिलांसाठी नारीशक्ती कोचचे उद्घाटन.
  • ३ मार्च २०१९ : खापरी ते सीताबर्डी मार्गासाठी सीएमआरएसकडून हिरवी झेंडी.
  • ७ मार्च २०१९ : खापरी ते सीताबर्डी १३.५ कि़मी.च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन.

 

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर