तक्रारींचा निपटारा : प्रवासी सुविधांचा घेतला आढावानागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार रेल्वे हमसफर सप्ताहादरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सेवा दिनानिमित्त प्रवाशांशी संवाद साधण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार गुप्ता यांनी रेल्वेगाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई मेलच्या प्रवाशांशी संवाद साधून रेल्वे सेवेविषयी त्यांच्या तक्रारी, सूचना, समाधानाबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यांचा निपटारा केला.विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध १२ रेल्वेगाड्यातील प्रवाशांशी थेट संवाद साधला. यात प्रवाशांना देण्यात येत असलेल्या सुविधांबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. सेवा दिनानिमित्त प्रवाशांच्या तक्रारी, सूचना ऐकून त्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वेगाडी क्रमांक ११४५४ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, ११०४० गोंदिया-कोल्हापूर, २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस, १८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस, १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, ११४०३ नागपूर-कोल्हापूर, १२७२१ हैद्राबाद-हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेस, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस, १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, १२२९५ बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस आणि १२९६९ कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेस या गाड्यातील प्रवाशांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
रेल्वे प्रवाशांशी संवाद
By admin | Updated: May 30, 2016 02:43 IST