शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांची समिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:26 IST

बेस्टच्या आगारांमध्ये महिला वाहकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट असून, चौकीच्या ठिकाणी तर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत, याकडे आ. वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईतील बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यस्थळी मिळणाऱ्या सुविधा, त्यांच्या अडचणी, प्रश्न, आदींचा आढावा घेऊन उपाय सूचविण्यासाठी सर्वपक्षीय पाच महिला आमदारांची समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल ३० दिवसांत मागविला जाईल व त्यातील सूचना, शिफारशींनुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत केली. 

बेस्टच्या आगारांमध्ये महिला वाहकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट असून, चौकीच्या ठिकाणी तर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत, याकडे आ. वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. कंत्राटी महिला वाहकांना तुटपुंजे वेतन मिळत असल्याचे सांगून त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली. आ. भारती लव्हेकर यांनी गर्भवती वाहक महिलांना कार्यालयीन काम देण्याची, तसेच मासिक पाळीच्या काळात ऐच्छिक रजा देण्याची मागणी केली. 

  मंत्री सामंत यांनी महिला वाहकांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्यासह आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश बेस्ट प्रशासनाला आजच दिले जातील, असे स्पष्ट केले. बेस्टची आर्थिक स्थिती उत्तम नसल्यामुळे कंत्राटी वाहकांना सेवेत नियमित करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   आ. यशोमती ठाकूर यांनी महिला बाल कल्याण विभागाचे बजेट किती खर्च होते, याचे नियमित ऑडिट करण्याची मागणी केली. याची दखल घेत दरवर्षी ऑडिट करण्याच्या सूचना तालिका अध्यक्षांनी दिल्या.

महिलांसाठी स्वतंत्र शौचालय व कक्ष विधान भवन इमारतीत महिला आमदारांसाठी स्वतंत्र शौचालय व कक्ष नाही, याकडे आ. भारती लव्हेकर यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले. आ. देवयानी फरांदे, आ. मनीषा चौधरी यांनीही हा मुद्दा लावून धरला. याची दखल घेत तालिका अध्यक्षांनी विधानभवन इमारतीत प्रत्येक माळ्यावर महिला आमदारांसाठी स्वतंत्र शौचालय व कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :BESTबेस्ट