शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  रेल्वे मार्गावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:07 IST

रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाला अहवाल देणार : विविध बाबींची होणार चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.रेल्वे बोर्डाने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीत मध्य रेल्वे मुख्यालयाचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभागाचे डीआरएम सोमेश कुमार श्रीवास्तव आणि मेट्रोचे रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर यांचा समावेश आहे. ही समिती मेट्रोची लोकल कुठून येणार, ती चालवणार कोण, कुठून कुठपर्यंत धावणार, किती स्टेशनला थांबा राहील, संबंधित मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कसा राहील, मेन्टेनन्स कुठे होईल, उत्पन्नातील वाट्याची विभागणी कशी होईल तसेच तिकीट दर किती राहतील याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. रेल्वे रुळावर लोकल मेट्रो चालविण्याचा विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला होता. मेट्रोच्या दुसºया टप्प्यातील प्रकल्प अहवाल सादर करण्यापूर्वी गडकरींनी याबाबत आढावा बैठक घेतली होती. बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दिक्षित रामटेक, कामठी, वर्धा, भंडारा पर्यंत रेल्वेमार्गावर मेट्रो लोकल चालविण्याबाबत सादरीकरण केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा प्रकल्प पुढे नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत महामेट्रोने दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावून रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून ही समिती नियुक्त केली आहे. सध्या रेल्वेकडे मुंबई मार्गावर अप आणि डाऊन अशा दोनच लाईन आहेत. याच लाईनवरून प्रवासी, माल वाहतूक करण्यात येते. हे मार्ग अतिशय व्यस्त असून थर्ड लाईन झाल्याशिवाय लोकल मेट्रो चालविणे शक्य होणार नाही. तसेच इटारसी-नागपूर आणि सेवाग्राम-बल्लारशा दरम्यानही थर्ड लाईन झाल्यावरच हा प्रकल्प अस्तित्वात येऊ शकणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर