आयुक्तांनी केली नागनदीची पाहणी
By Admin | Updated: February 2, 2015 01:07 IST2015-02-02T01:07:53+5:302015-02-02T01:07:53+5:30
केंद्र सरकारने नागनदीच्या पुनरुद्धारासाठी पुन्हा सखोल विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी स्थायी समितीमध्ये दिल्लीतील एका एजन्सीला कामसुद्धा देण्यात आले आहे.

आयुक्तांनी केली नागनदीची पाहणी
नागपूर : केंद्र सरकारने नागनदीच्या पुनरुद्धारासाठी पुन्हा सखोल विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी स्थायी समितीमध्ये दिल्लीतील एका एजन्सीला कामसुद्धा देण्यात आले आहे. दोन महिन्यात डीपीआर तयार करून सादर करावयाचा आहे. यापार्श्वभूमीवर मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने पुढाकार घेत शनिवारी नागनदीचा दौरा करून पाहणी केली.
आयुक्तांनी नागनदी आणि तलावांसंबंधात बैठक बोलाविली. यामध्ये सोनेगाव तलाव, अंबाझरी, गांधीसागर, पांढराबोडी, फुटाळा, तेलंगखेडी, नाईक तलाव, नागनदी यांची सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती घेतली. त्यानंतर आयुक्तांनी अंबाझरी टी पॉइंट येथून दौऱ्याला सुरुवात केली.
कॅनाल रोड, रामदासपेठ, बर्डी, यशवंत स्टेडियम, संगम स्थळ, मोक्षधाम, ग्रेट नाग रोड, अशोक चौक, जुनी शुक्रवारी, जगनाडे चौक, पारडी पूल परिसराची पाहणी केली. यावेळी नागनदीमध्ये अस्वच्छ पाणी कुणी सोडणारा नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. दौऱ्यात कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्याम चव्हाण, नदी-तलाव प्रकल्प प्रमुख मो. इसराईल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, अभियंता सुरेश भजे, राजेश दुपारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)