रस्ते तपासणीसाठी आयुक्त स्पॉटवर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:10 IST2021-08-26T04:10:59+5:302021-08-26T04:10:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी पूर्व नागपुरातील भांडेवाडी जवळील संघर्षनगर ते ...

Commissioner for road inspection on the spot () | रस्ते तपासणीसाठी आयुक्त स्पॉटवर ()

रस्ते तपासणीसाठी आयुक्त स्पॉटवर ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी पूर्व नागपुरातील भांडेवाडी जवळील संघर्षनगर ते चांदमारी रस्त्याच्या कामाची स्पॉट तपासणी केली. काम गुणवत्तापूर्ण नसल्यास कारवाईचा इशारा दिला.

मनपातर्फे संघर्षनगर ते चांदमारीकडे जाणाऱ्या दीड किलोमीटर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी ८.९५ कोटी रुपये मंजूर आहे. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी रस्त्यावर ट्रायल पिट करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जेसीबी द्वारे रस्त्यावर खड्डा करून कामाची गुणवत्ता राधाकृष्णन बी. यांनी तपासली. सध्या या रोडवर डब्ल्यू.बी.एम.चे काम सुरु आहे.

यापूर्वी मनपा आयुक्तांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डचा दौरा करुन तेथील कामाची माहिती घेतली. अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता धनंजय मेंडुलकर, सोनाली चव्हाण, राजेश दुफारे व अन्य उपस्थित होते.

Web Title: Commissioner for road inspection on the spot ()