शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

महापौर व स्थायी समिती अध्यक्षांची मागणी आयुक्तांनी धुडकावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 20:28 IST

महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरू आहे. त्यात आयुक्तांनी महापौर संदीप जोशी व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. पत्रात केलेली मागणी धुडकावल्याने पदाधिकारी व आयुक्त याच्यांतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देअर्थसंकल्पासाठी मागणीनुसार अधिकारी देण्यास नकार : पदाधिकारी व आयुक्त यांच्यातील संघर्ष वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरू आहे. त्यात आयुक्तांनी महापौर संदीप जोशी व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. पत्रात केलेली मागणी धुडकावल्याने पदाधिकारी व आयुक्त याच्यांतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.मागील १२ वर्षापासून स्थायी समिती अध्यक्षांचे ओएसडी म्हणून प्रफुल्ल फरकासे जबाबदारी सांभाळत होते. अर्थातच स्थायी समितीचा अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असायची. आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्षांना कोणतीही सूचना न देता दोन महिन्यापूर्वी त्यांची धंतोली झोन कार्यालयात बदली केली. २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी फरकासे यांना दहा दिवसासाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात यावे, अशा आशयाचे पत्र पिंटू झलके यांनी आयुक्तांना दिले. सोबतच मोबाईलवरून या संदर्भात चर्चा केली. परंतु आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. त्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी २९ मे रोजी आयुक्तांना पत्र दिले. अर्थसंकल्पासाठी फरकासे यांना उपलब्ध करावे, अशी सूचना या पत्रातून केली. तसेच महापालिका कायद्यानुसार आयुक्तांच्या सुट्या मंजूर करणे, न करण्याचे अधिकार स्थायी समिती अध्यक्षांना आहेत. असे असतानाही झलके यांनी फरकासे यांच्या बदलीवर कोणतीही प्रतिक्रि या दिली नाही. एखाद्या अधिकाऱ्याला अर्थसंकल्पाच्या कामाकरिता दहा दिवसासाठी मागितले असेल तर फार मोठे पाप केलेले नाही. एवढा आडमुठेपणा कशासाठी? स्थायी समिती व सभागृहापेक्षा आपण सर्वशक्तिमान आहात, असा टोलाही या पत्रातून लगावला आहे.आयुक्तांनी महापौरांना कळविला नकारमनपाचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रफुल्ल फरकासे यांना दहा दिवसासाठी स्थायी समितीकडे देण्याची मागणी आयुक्तांनी धुडकावली आहे. फरकासे कनिष्ठ अभियंता असून त्यांचा अर्थसंकल्पाशी कोणताही संबंध नाही. तथापि लेखा व वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणे अभिप्रेत असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.आयुक्तांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देशस्थायी समिती अध्यक्ष व महापौरांची मागणी आयुक्तांनी धुडकावली. याचे पडसाद सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. समितीच्या बैठकीला अनुपस्थित लेखा व वित्त अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे तर समितीच्या पुढील बैठकीला आयुक्तांनी उपस्थित राहावे, असे निर्देश पिंटू झलके यांनी दिले. या निर्देशानुसार आयुक्त उपस्थित राहातात की निर्देश धुडकावतात, यावरून पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSandip Joshiसंदीप जोशीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका