आयुक्तांनी केली कोरोनाबाधितांच्या घराची पाहणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:18+5:302021-03-17T04:08:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मंगळवारी मनपाच्या मंगळवारी झोनच्या गोरेवाडा भागात आर.आर.टी. ...

आयुक्तांनी केली कोरोनाबाधितांच्या घराची पाहणी ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मंगळवारी मनपाच्या मंगळवारी झोनच्या गोरेवाडा भागात आर.आर.टी. टीमसोबत कोरोनाबाधितांच्या घरांची पाहणी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. टिकेश बिसेन व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतीक खान उपस्थित होते.
नियंत्रण कक्षावरून गृह विलगीकरणमध्ये असलेल्या कोरोनाबाधितांना पहिल्या, चौथ्या, सातव्या व दहाव्या दिवशी फोन करून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेण्यात यावी. तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या २०-३० नागरिकांची चाचणी करण्याचे निर्देश झोनच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले.
टीमसोबत गृह विलगीकरणामध्ये कोरोनाबाधित नियमांचे पालन करतात की नाही, याचीही आयुक्तांनी तपासणी केली. ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जास्तीतजास्त नोंदणी करा. मास्कचा उपयोग न करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना दंड करण्याचे निर्देश दिले.
....
कामाशिवाय घराबाहेर पडू नका
वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्बध जारी केले असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. मनपा आयुक्तांनी अशा नागरिकांची विचारपूस करणे आणि ज्या नागरिकांचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्यांना दंड लावण्याचे निर्देश दिले आहे. नागरिकांनी कामाशिवाय रस्त्यावर फिरू नये, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.