संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:28+5:302021-02-05T04:52:28+5:30

नागपूर : ओमनगर सक्करदरा येथील हनुमान देवस्थान पंचकमिटीच्या वतीने संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सवाला २ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. ९ फेब्रुवारीपर्यंत ...

Commencement of Sant Nivruttinath Maharaj commemoration | संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सवाला प्रारंभ

संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सवाला प्रारंभ

नागपूर : ओमनगर सक्करदरा येथील हनुमान देवस्थान पंचकमिटीच्या वतीने संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सवाला २ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. ९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळी ५.३० वा काकडा, दुपारी १ ते ३ महिलांचे भजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री ८ ते १०.३० महिलांचे हरिकीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान रात्री ८.३० ला अनुक्रमे विलास महाराज जिल्हारे, उमेश महाराज बारापात्रे आणि भीमराव कोठे महाराज यांचे कीर्तन होईल. एकादशीनिमित्त ९ फेब्रुवारीला दु. १२ ते ते २ वाजेपर्यंत महेश नंदरधने महाराज यांचे हरिकीर्तन होईल, अशी माहिती हनुमान देवस्थान पंचकमिटी, श्री निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव समिती आणि माँ वैष्णोदेवी नवरात्र उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता उत्सवाचे स्वरूप आटोपशीर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Commencement of Sant Nivruttinath Maharaj commemoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.