दिव्यांगासाठी शीघ्र निदान व उपचार केंद्राची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST2020-12-09T04:07:16+5:302020-12-09T04:07:16+5:30

नागपूर : उत्तर अंबाझरी मार्गावरील दिव्यांगासाठी मूक आणि बधिर औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांसाठी शीघ्र निदान व उपचार केंद्राचे जिल्हाधिकारी ...

Commencement of early diagnosis and treatment center for the disabled | दिव्यांगासाठी शीघ्र निदान व उपचार केंद्राची सुरुवात

दिव्यांगासाठी शीघ्र निदान व उपचार केंद्राची सुरुवात

नागपूर : उत्तर अंबाझरी मार्गावरील दिव्यांगासाठी मूक आणि बधिर औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांसाठी शीघ्र निदान व उपचार केंद्राचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. मतिमंद अथवा दिव्यांग असलेल्या बालकांची विशेष काळजी घेताना त्यांच्या संगोपनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शीघ्र निदान व उपचार केंद्र पालकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. कुटुंबातील दिव्यांग बालकाबाबत पालकांनी अधिक जागृतपणे संगोपन करण्यासाठी या उपचार केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला जिल्हा समाज कल्याण अधीक्षक प्रवीण मेंढे, मूकबधिर औद्योगिक संस्थेच्या प्राचार्या डॉ. मीनल सांगोळे, वाचा उपचार तज्ज्ञ अरुणा आढाव उपस्थित होते. दिव्यांग बालकांचे निदान व उपचार वेळीच केल्यास त्यांचे पुनर्वसन करणे सोयीचे होते. दिव्यांग बालकांचे संगोपन ही मोठी जबाबदारी असल्यामुळे पालकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी शीघ्र निदान व उपचार केंद्राची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. या केंद्रामार्फत अशा पालकांचे समुपदेशन करण्यासोबतच विविध सोयी व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रवींद्र ठाकरे यांनी केले. यावेळी दिव्यांग संस्थेच्या वर्षा साठवणे, मीनाक्षी गुंडेवार, राजेंद्र आढाव तसेच शिक्षक-पालक आदी उपस्थित होते.

Web Title: Commencement of early diagnosis and treatment center for the disabled