नागपूर : जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच शहरात शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे वर्षभरापासून कोरोनाच्या धास्तीत असलेल्या नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीणमध्ये १, तर जिल्ह्याबाहेरील ३ असे एकूण ४ रुग्णांचे मृत्यू झाले. आज ३२५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या १३३६७०, तर मृतांची संख्या ४१५० वर पोहोचली. २९२ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४.४२ टक्क्यांवर पोहोचले.
नागपूर शहरात पहिल्या मृत्यूची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. जुलै महिन्यानंतर मृत्यूचा आकडा वाढत गेला. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. आज पहिल्यांदाच शहरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. आतापर्यंत शहरात २७२१, ग्रामीणमध्ये ७३९, तर जिल्ह्याबाहेरील ६९० रुग्णांचे मृत्यू झाले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २९०, ग्रामीण भागातील ३२, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवार (दि. २८)च्या तुलनेत आज कमी चाचण्या झाल्या. ३१९१ आरटीपीसीआर, ३८१ रॅपिड अँटिजेन असे मिळून एकूण ३५७२ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत ९ टक्के कोरोनाबाधितांची नोंद झाली.
हजाराखाली रुग्ण भरती
मागील काही दिवसांपासून शासकीयसह खासगी रुग्णालयांत भरती रुग्णांची संख्या हजाराच्या वर जात होती
- दैनिक संशयित : ३५७२
- बाधित रुग्ण : १३३६७०
_- बरे झालेले : १२६२०९
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३३११
- मृत्यू : ४१५०