शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संविधान टिकविण्यासाठी एकत्र या; ‘दक्षिणायान’चे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 04:17 IST

देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे.

नागपूर : देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देत दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.सत्य, अहिंसा व संविधान सुरक्षेचा संदेश देण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी व दक्षिणायनचे डॉ. गणेश देवी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मौन पदयात्रेत देशभरातील नामवंत साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये कुमार शिराळकर, कुमार केतकर, रावसाहेब कसबे, मेधा पाटकर, मेधा पानसरे, उल्का महाजन, लीलाताई चितळे, डॉ. प्रज्ञा दया पवार, राजन अन्वर , विद्या बाळ, शारदा साठे, नागेश चौधरी, धनाजी गुरव, राजन खान, डॉ. क्रिष्णा कांबळे, अमिताभ पावडे, कवी ज्ञानेश वाकुडकर, सुनैना आझाद, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, आसाराम लोमटे, प्रफुल्ल शिलेदार, रजिया पटेल, हमीद दाभोळकर, वीरा राठोड,अभय कांता, शमसुद्दीन तांबोळी, जमाते इस्लामीचे डॉ. अनवर सिद्दीकी, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.सुरुवातीला दीक्षाभूमीवर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत पदयात्रा सुरू करण्यात आली. हातात देशातील महापुरुषांचे फोटोसह अनेक प्रकारचे संदेश देणारे फलक घेऊन व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांना नमन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी