अत्यावश्यक असेल तरच मनपात या : मनपा आयुक्तांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:30 IST2021-04-01T22:27:58+5:302021-04-01T22:30:52+5:30
Appeal of Municipal Commissioner संसर्ग टाळण्यासाठी मुख्यालय व झोन कार्यालयात अतिआवश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना केले आहे.

अत्यावश्यक असेल तरच मनपात या : मनपा आयुक्तांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. महापालिका मुख्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, विविध भागातील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी मुख्यालय व झोन कार्यालयात अतिआवश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना केले आहे.
या संदर्भात नुकतेच मनपातर्फे ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार मनपा कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तातडीचे कामासाठीच पूर्वपरवानगी घेऊन प्रवेश दिला जाईल. तसेच नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास ते मनपाचे ‘नागपूर लाईव्ह सिटी’ या मोबाईल अॅपवर तक्रार नोंदवू शकतात. या अॅपव्दारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागरिकांना मनपामध्ये येण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कोरोना (कोविड-१९)संबंधी तक्रार असल्यास कोरोना नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ वर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.