लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या एका आरोपीने मोमिनपुऱ्यात एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. शुक्रवारी रात्री ७.३० वाजता ही घटना उघडकीस आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपी असलम कुरेशी (वय ४०, रा. अंसारनगर) याला अटक केली आहे.शुक्रवारी सायंकाळी आरोपी असलम पीडित मुलीच्या घरी निमंत्रण पत्रिका घेऊन आला. यावेळी पीडित मुलीची मोठी बहीण आणि वडिल बाजूच्या घरी गेले होते. घरात ती एकटीच असल्याचे पाहून असलमची नियत खराब झाली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने वडील घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तो शेजाऱ्यांना माहीत पडला. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मुलीला घेऊन पालकांनी तहसील ठाणे गाठले. पोलिसांनी लगेच धावपळ करून गुन्हा दाखल केला आणि आरोपी असलमला अटक केली.
लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरी येऊन अल्पयवीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:35 IST
लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या एका आरोपीने मोमिनपुऱ्यात एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. शुक्रवारी रात्री ७.३० वाजता ही घटना उघडकीस आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपी असलम कुरेशी (वय ४०, रा. अंसारनगर) याला अटक केली आहे.
लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने घरी येऊन अल्पयवीन मुलीवर बलात्कार
ठळक मुद्देपरिसरात तणाव : आरोपीला अटक