काँग्रेसचे घर-घर चलो अभियान

By Admin | Updated: October 5, 2014 00:56 IST2014-10-05T00:56:47+5:302014-10-05T00:56:47+5:30

संपर्कातून, भेटीगाठीतून लोक जुळतात, प्रत्यक्ष लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांचे मत परिवर्तन होते. त्यामुळे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांनी प्रत्यक्ष

Come to the Congress House-to-house campaign | काँग्रेसचे घर-घर चलो अभियान

काँग्रेसचे घर-घर चलो अभियान

मध्य नागपुरात पदयात्रा : प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर
नागपूर : संपर्कातून, भेटीगाठीतून लोक जुळतात, प्रत्यक्ष लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांचे मत परिवर्तन होते. त्यामुळे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांनी प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर देऊन ‘घर-घर चलो’ अभियान राबविले आहे. या अभियानांतर्गत पदयात्रा काढून, लोकांमध्ये मिसळून ते घराघरात पोहचत आहेत.
निवडणुकीचे मतदान जसजसे जवळ येत आहे, तसतसे उमेदवाराच्या प्रचारात परिवर्तन होत आहे. मध्य नागपूरचे उमेदवार अनिस अहमद यांनी सुरुवातीला स्कुटर रॅलीवर भर दिला. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला. आता त्यांनी प्रचाराला नवीन वळण दिले आहे. घर-घर चलो अभियानावर भर दिला आहे. पदयात्रा काढून ते घरोघरी पोहचून मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत. विजयादशमीच्या पर्वावर त्यांनी गंगाबाई घाट परिसरातील स्विपर कॉलनी येथे हे अभियान राबविले. स्विपर कॉलनीतील गल्ली-बोळीतील प्रत्येक घरात पोहचून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. स्विपर कॉलनीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या परिवाराची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे महाल परिसरातील बडकस चौक, पाताळेश्वर मार्ग, भूतिया दरवाजा, नवी शुक्रवारी परिसर, बुद्धू खाँ का मिनारा, भालदारपुरा, गंजीपेठ या परिसरातही त्यांनी हे अभियान राबविले. लोकांना ईद आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. या अभियानात त्यांच्यासोबत रवी पैगवार, नरेंद्र पोहाणे, बंटी शेळके, ईश्वर चौधरी, राजू महाजन, आप्पा मोहिते, आशिष गजभिये, अशोक निखारे, नरेंद्र कडू, आशिष वारजूरकर, दिलीप मुनीश्वर, राजू चांदपूरकर, कमल वांदे, रेखा बुरडकर, कमल लारोकर, रोशन पंचभुते, तीतर भानारकर, यशवंत तुलसीकर, महेश वाटकर, राजू वैरागडे, मनोज शिवहरे, राजपाल खोब्रागडे, विनोद लोणारे, लक्ष्मण जुमडे, बबिता मसराम, शुभांगी कुर्जेकर, विक्की भांडारकर, प्रवीण लांबट आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Come to the Congress House-to-house campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.