परिमंडळ-३ मध्ये कोम्बिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:41+5:302021-05-30T04:07:41+5:30
६० ठिकाणी तपासणी : गुन्हेगारांची झाडाझडती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शुक्रवारी रात्री परिमंडळ-३ मधील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ...

परिमंडळ-३ मध्ये कोम्बिंग ऑपरेशन
६० ठिकाणी तपासणी : गुन्हेगारांची झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी रात्री
परिमंडळ-३ मधील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी कोम्बिंग ऑपरेशन केले.
गणेशपेठ, कोतवाली आणि पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कोम्बिंग ऑपरेशन शुक्रवारी रात्री ७ ते १० या कालावधीत करण्यात आले. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६० सराईत गुन्हेगारांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. यावेळी तीन अवैध दारूचे गुत्ते पोलिसांच्या हाती लागले. एक बाहेरगावचा गुंडही पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
--
कुख्यात योगेश ऊर्फ अमन किशोर गुप्ता (वय २०) याच्याविरुद्ध एमपीडीए लावून त्याला कारागृहात डांबण्यात आले. कुख्यात गुप्ताविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वृत्तीत फरक पडत नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याला पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी मंजुरी दिली. त्यानुसार गुप्ताला जेरबंद करून कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
---