कलर्स आणि लोकमत सखी मंचचा संक्रांती मेळावा आज
By Admin | Updated: January 24, 2016 02:40 IST2016-01-24T02:40:57+5:302016-01-24T02:40:57+5:30
लोकप्रिय वाहिनी कलर्स आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाने भरलेला संक्रांती मेळावा ...

कलर्स आणि लोकमत सखी मंचचा संक्रांती मेळावा आज
भव्य प्रदर्शन आणि विविध मनोरंजक स्पर्धा : कलर्स कृष्ण भजनांचा विशेष कार्यक्रम
नागपूर : लोकप्रिय वाहिनी कलर्स आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाने भरलेला संक्रांती मेळावा रविवार २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत गीता मंदिर, सुभाष मार्ग, कॉटन मार्केट येथे होणार आहे. यात प्रामुख्याने महिलांसाठी उखाणे स्पर्धा होणार आहे. यात महिला उखाणे घेतील. याप्रसंगी तिळाच्या व्यंजनांची स्पर्धा होईल. स्पर्धकांना घरून तिळाचा गोड पदार्थ तयार करून आणावा लागेल. सखींसाठी होणाऱ्या फॅशन स्पर्धेत काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून स्त्रियांना सहभागी होता येईल. स्पर्धकांना यातील एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेत सिमीत संख्येत प्रवेश देण्यात येणार असून सर्व स्पर्धकांना आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.
कलर्स हे महिलांचे आवडते चॅनल आहे. कलर्स आणि लोकमत सखी मंच यांनी संस्कृती सांभाळणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून संक्रांती मेळावा त्यापैकीच एक आहे. याप्रसंगी विविध स्टॉल्स लावण्यात येणार आहे. नोंदणीसाठी लोकमत सखी मंचच्या कार्यालयात संपर्क साधावा. मर्यादित स्टॉल्स लावण्यात येणार असल्याने इच्छुकांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या विषयाला घेऊन कलर्स वाहिनीवर ‘कृष्णदासी’ ही मालिका लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून रात्री १०.३० वाजता प्रदर्शित होईल. देवदासी प्रथेवर आधारित ही मालिका कुमुदिनी, तुलसी आणि आराध्या नामक स्त्री नायिकांवर तयार करण्यात आली आहे. प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या देवदासी प्रथेला मार्मिक स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्न कलर्सने केला आहे. यासाठी विशेषत्वाने कृष्णभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व स्पर्धा नि:शुल्क घेण्यात येणार आहे. नोंदणीसाठी २४२९३५५ आणि ९४२३६२८५००, ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
हा मेळावा सर्वांसाठी खुला आहे. सखी मंच सदस्य, लोकमत युवा नेक्स्ट, लोकमत कॅम्पस क्लब सदस्य आणि लोकमत समाचारचे वाचक मेळाव्याला आमंत्रित आहे.
सर्व उपस्थित सखींना हळदी, कुंकू, तिळगूळ आणि वाण वितरित करण्यात येईल.
या वर्षी निकालस अलंकारच्यावतीने सिल्व्हर कोटेड लक्ष्मीचे नाणे प्रत्येक सखीला वाण म्हणून देण्यात येईल.
होम मिनिस्टर खेळ जिंकणाऱ्या सखींना भेट म्हणून पैठणी देण्यात येईल. अन्य स्पर्धा विजेत्यांना निशा हर्बलच्यावतीने गिफ्ट प्रदान करण्यात येईल.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञ डॉ. सौरभ प्रसाद यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्वचा रोगावर डॉ. अंशुल जैन मार्गदर्शन करतील.
स्टॉल्सवर कपडे, ज्वेलरी, बॅग, सौंदर्य प्रसाधन, गृहोपयोगी वस्तू, स्वादिष्ट खाद्य, व्यंजन, पिझ्झा, बर्गर, मिसळपाव, आईसक्रिम शुगर, सुका मेवा आणि अन्य पदार्थ कमी किमतीत उपलब्ध राहतील.