शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:53 IST

जामठा शिवारात हिंगणा बायपास रोडवर दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत एका ट्रकमधील दोन चालकांचा मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील हिंगणा बायपास रोडवरील घटना : क्लीनर गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (हिंगणा) : जामठा शिवारात हिंगणा बायपास रोडवर दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत एका ट्रकमधील दोन चालकांचा मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडला.पुरुषोत्तम ब्रजलाल चंद्रवंशी (३२), पूरण शिवलाल यादव (२९), अशी मृत चालकांची नावे आहेत. रामदयाल यादव (वय ३४) असे जखमी क्लीनरचे नाव आहे. त्याच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही जि. राजनांदगाव, छत्तीसगड येथील राहणारे आहेत. हे तिघेही ट्रक क्रमांक सी.जी. ०७/ए.एक्स.६३१३ ने पांजरी टोलनाका येथून हिंगणा वळणमार्गाने अमरावती महामार्गाकडे जात होते. पुरुषोत्तम हा ट्रक चालवीत होता तर दोघे केबिनमध्ये त्याच्या शेजारी बसले होते. जामठा शिवारात कॅन्सर हॉस्पिटलसमोर असलेल्या डिव्हायडरलगत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.पी.२०/ एच. बी ५३३८ च्या चालकाने अचानक ‘यू टर्न’ घेत रोडच्या दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही ट्रकची धडक झाली. या अपघातात ट्रक क्रमांक सी.जी. ०७/ए.एक्स. ६३१३ मधील पूरण याचा जागीच मृत्यू झाला तर पुरुषोत्तम व रामदयाल हे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. हिंगणा पोलिसांना माहिती मिळताच हवालदार विनोद देशमुख व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना उचलून पोलिसांनी त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान पुरुषोत्तम चंद्रवंशी याचा मृत्यू झाला. दुसऱ्या ट्रकचा चालक हा फरार असून, हिंगणा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात विनोद देशमुख करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू