महाविद्यालयीन विद्यार्थी करणार जागर
By Admin | Updated: October 9, 2014 00:54 IST2014-10-09T00:54:12+5:302014-10-09T00:54:12+5:30
मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. त्यासाठी गुरुवारी ९ तारखेला संविधान चौकातून रॅली काढण्यात येत

महाविद्यालयीन विद्यार्थी करणार जागर
मतदार जागृतीनिमित्त आज रॅली : १५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर: मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. त्यासाठी गुरुवारी ९ तारखेला संविधान चौकातून रॅली काढण्यात येत असून त्यात १५०० विद्यार्थी सहभागी होतील.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा निवडणूक शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान चौकाजवळील विद्यमाने वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्था येथून विद्यार्थ्यांची रॅली निघेल.
व्हेरायटी चौक, महाराजबाग रोड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चौक, शासकीय मुद्रणालय आणि संविधान चौक या मार्गाने ही रॅली जाईल. यात विविध महाविद्यालयातील रासेयोचे सरासरी १५०० विद्यार्थी सहभागी होतील.
मतदार जागृती अभियानासाठी नियुक्त करण्यात आलेली ब्रॅन्ड अॅम्बेसेडर व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावने हिच्यासह ‘स्वीप’चे निरीक्षक विजयकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके, उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, प्रमोद भुसारी, रासेयोचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार हे रॅलीत सहभागी होतील व नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करतील. (प्रतिनिधी)