जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांचे धाबे दणाणले
By Admin | Updated: June 7, 2015 02:42 IST2015-06-07T02:42:43+5:302015-06-07T02:42:43+5:30
दलालाविरुद्ध करण्यात आलेल्या प्रशसनाच्या कडक कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील दलाल आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांचे धाबे दणाणले
कारवाईचा दणका : कर्मचाऱ्यांमध्ये पसरली भीती
नागपूर : दलालाविरुद्ध करण्यात आलेल्या प्रशसनाच्या कडक कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील दलाल आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपल्यावरही करवाई होईल, अशी भीती पसरली आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय दलालमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचे परिणाम शुक्रवारी तब्बल ७ दलालांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून पकडण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आले. ३ दलालांना यापूर्वीच पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे येथील दलालांचे धाबे तर दणाणलेच आहे. परंतु त्यांचे तार ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत जुळले आहेत त्यांचेही धाबे दणाणले आहे. येणाऱ्या काही दिवसात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. (प्रतिनिधी)
तो अधिकारी कोण?
शुक्रवारी दलालांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एका अधिकाऱ्याच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्राचे निवेदन सापडले होते. पोलिसांनी त्या अधिकाऱ्याला विचारपूस करण्यासाठी सदर पोलीस ठाण्यातही बोलावले होते. तो अधिकार कोण, अशी चर्चा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती.