शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावरील अफवांचा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 21:40 IST

सावधान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणावर फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अनेकांना याचा मनस्ताप होतोय. खुद्द नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

ठळक मुद्देम्हणे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह : सायबर सेलकडे तक्रार, कडक कारवाईचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सावधान, कोरोनाबाबतसोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणावर फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अनेकांना याचा मनस्ताप होतोय. खुद्द नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. सोशल मीडियावरील एका वेबसाईटने जिल्हाधिकाऱ्यांनाच कोरोना विषाणूची लागण झाल्याचे खोटे वृत्त प्रसारित केले. त्यानंतर त्यांना सकाळपासून नातेवाईकांसह अनेकांचे फोन येऊ लागले. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामावर झाला. अखेर जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी स्वत: पत्रपरिषद घेऊन हे वृत्त खोटे असल्याचा खुलासा केला. तसेच विशेष शाखा व सायबर सेलकडे तक्रार केली असून कोरोनाबाबत अफवा पसरवून समाजात भीती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले की, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. एका रुग्णाच्या मुलीचे रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली. सोशल मीडिया वापरताना विशेषत: कोरोनाबाबत खबरदारी घेण्याबाबत मी अनेकदा सांगत आहे. तरीही फेक मेसेज सुरूच आहेत. स्वत: मलासुद्धा याचा फटका बसला. सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केले, परंतु ‘लयभारी’ आणि आणखी एका वेबसाईटने सर्रासपणे मला (नागपूरचे जिल्हाधिकारी ठाकरे) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त प्रसारित केले. त्यामुळे सकाळपासून मला अनेकांचे फोन येत आहेत. माझे दैनंदिन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे मला याची दखल घ्यावी लागली. यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. यासोबतच सायबर सेलला सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाईचे निर्देशसुद्धा देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाSocial Mediaसोशल मीडियाcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर