जिल्हाधिकारी घेणार कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
By Admin | Updated: September 10, 2015 03:32 IST2015-09-10T03:32:15+5:302015-09-10T03:32:15+5:30
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ध्वनी प्रदूषण नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ..

जिल्हाधिकारी घेणार कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
नागपूर : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ध्वनी प्रदूषण नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोरील याचिका (क्र. १७३/२०१०) डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर मध्ये ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियम) नियम २००० ची अंमलबजावणी करण्याबाबत उच्च न्यायालयाने १३ मार्च २०१५ रोजीच्या आदेशातील बाब क्रमांक ३५(४) व (५) बाबत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहे. तसेच पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय २१ एप्रिल २००९ नुसार संबंधित विभागाच्या अधिपत्याखालील २००० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समित्या गठित करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. (प्रतिनिधी)