खैरे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

By Admin | Updated: April 25, 2016 02:47 IST2016-04-25T02:47:23+5:302016-04-25T02:47:23+5:30

खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचद्वारे सरदार वल्लभभाई पटेल मैदानात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Collective marriage ceremony of Khairu Kunbi Samaj | खैरे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

खैरे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या नवदाम्पत्यांना शुभेच्छा
नागपूर : खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचद्वारे सरदार वल्लभभाई पटेल मैदानात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार देवराव रडके, मनपाचे परिवहन सभापती नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर उपस्थित होते.
समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचतर्फे पहिल्यांदाच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात खैरे कुणबी समाजातील सहा जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. मंचातर्फे प्रत्येक जोडप्याला पाच भांडे भेट देण्यात आली. या विवाह सोहळ्यासाठी नागपूर विभागातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित झाले होते.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, शेतकरी कुटुंबासाठी सामूहिक विवाह सोहळे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात आपल्या मुला-मुलींचे लग्न थाटामाटात करता येते. लग्नात होणारा अवाढव्य खर्च, त्यासाठी घेण्यात येणारे कर्ज, या सोहळ्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून वाचतो. प्रत्येक समाजाने अशा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून, अवाढव्य होणारा खर्च थांबवावा. गडकरींनी सर्व जोडप्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाग्यश्री गिल्लोरकर, वंदना पाल, माजी महापौर पांडुरंग हिवरकर, डी. के. आरीकर, शेषराव येलकर, प्रदीप वादाफले, डॉ. विलास भोयर, अ‍ॅड. रमेश कोठाळे, भगवंतराव रडके पाटील, आस्तिक शहारे, भगवान रडके, विठ्ठलराव हुलके, नारायण नरुले, बळवंत भोयर, डॉ. आशिष पोंगळे, दिगांबर उपरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Collective marriage ceremony of Khairu Kunbi Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.