शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

नागपुरात सर्दी, तापाची दहशत वाढली; पालकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 8:00 PM

पावसाच्या आगमनामुळे जरी घाम व गरमीपासून सुटका झाली असली तरी, पावसाळ्यामुळे अनेक आरोग्य समस्या डोके वर काढू शकतात.

ठळक मुद्देकाळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलत्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. विशेषत: लहान मुले लवकर आजारी पडतात. सध्या कोरोनाच्या दहशतीत सर्दी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डॉक्टरांच्या मते, भीती बाळगू नका, काळजी घ्या. प्रत्येक सर्दी, ताप आदी लक्षणे कोविडचीच असतील, असे नाही. परंतु स्वत:हून औषधी घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. दोन वर्षांवरील मूल असेल तर त्याला मास्क लावा, असा सल्लाही दिला आहे.पावसाच्या आगमनामुळे जरी घाम व गरमीपासून सुटका झाली असली तरी, पावसाळ्यामुळे अनेक आरोग्य समस्या डोके वर काढू शकतात. सामान्यत: अस्वच्छ पाणी व अन्न या माध्यमातून अनेक पावसाळी आजार निर्माण होतात. विशेषत: या दिवसात सर्दी, खोकला व तापाचे अधिक रुग्ण दिसून येतात. परंतु या वर्षी अशा रुग्णांची संख्या फार कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजार होऊच नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.२० टक्के सर्दी, तापाचे रुग्णप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर म्हणाले, कोरोनाच्या भीतीने व शाळाही बंद असल्याने फार कमी लहान मुले घराबाहेर पडतात. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सर्दी, तापाचे रुग्ण कमी आहेत. सध्या याचे २० टक्के रुग्ण दिसून येत आहेत. काही पालक या लक्षणांची कोविडशी जुळवाजुळव करून पाहत असल्याचेही निदर्शनात आले आहे. कोविड रुग्णाशी किंवा बाहेरील व्यक्तीशी संपर्कात नसाल तर हा आजार होणार नाही, हे लक्षात घ्यायला हव,असेही ते म्हणाले. पावसात भिजू नका, पाणी उकळून प्या, स्वच्छता पाळाडॉ. बोधनकर म्हणाले, पावसात न भिजल्यास, दूषित अन्नाचे सेवन न केल्यास, पाणी उकळून, थंड करून प्यायल्यास व स्वच्छता राखल्यास या दिवसांतील ९० टक्के आजारांना दूर ठेवता येऊ शकते. सर्दी, तापाच्या रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दोन वर्षाखालील या आजाराचे बाळ असेल तर त्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. दोन वर्षावरील बाळ असेल तर मास्क लावून ठेवा. डॉक्टरांकडे जाताना मास्क, सॅनिटायझेशन व स्वच्छतेचे कठोरतेने पालन करा.कोरोनाची लक्षणेताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाची चव जाणे, अशक्तपणा आदी कोरोनाची लक्षणे आहेत.हे करा : पावसात भिजू नका:: बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा:: उकळून थंड केलेले पाणी पिण्यास वापरा:: आजारी व्यक्तीपासून दूर रहा:: सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी सहा फूट अंतर ठेवा:: गर्दी करू नका:: दैनंदिन जीवनात हस्तांदोलन, गळाभेट टाळा:: घरी पाहुणचार टाळा, इतरांच्या घरी जाणे टाळा:: आरोग्याची कुठलीही तक्रार भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या:: ६०वर्षांवरील ज्येष्ठांची काळजी घ्या.

 

टॅग्स :Healthआरोग्य