शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

अदखलपात्र गुन्ह्यांची दखल, हायकोर्टाने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:47 IST

एका प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यांची दखल घेऊन एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. अशी गंभीर चूक करणाऱ्या पोलिसांना सेवेत कायम ठेवणे प्रशासन व गुन्ह्याच्या तपासाकरिता धोकादायक ठरू शकते. अशा चुकांमुळे न्यायदान प्रक्रिया प्रभावित होते, असे न्यायालय म्हणाले.

ठळक मुद्देअशी चूक होणे धोकादायक : न्यायदान प्रक्रिया प्रभावित होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यांची दखल घेऊन एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. अशी गंभीर चूक करणाऱ्या पोलिसांना सेवेत कायम ठेवणे प्रशासन व गुन्ह्याच्या तपासाकरिता धोकादायक ठरू शकते. अशा चुकांमुळे न्यायदान प्रक्रिया प्रभावित होते, असे न्यायालय म्हणाले.हे प्रकरण वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शैलेंद्र शाहू (४४) यांच्यावर तहसील कार्यालयात प्रवेश करून गोंधळ घालणे, सरकारी कामकाजात अडथळे निर्माण करणे व तहसीलदारांना धमकी देणे, असे आरोप करण्यात आले होते. ६ जून २०१८ रोजी प्रभारी तहसीलदार व्ही. एस. भागवत यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी शाहू यांच्याविरुद्ध भादंवितील कलम १८६ व ५०६ हे गुन्हे नोंदविले. त्यामुळे शाहू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शाहू यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप अदखलपात्र होते व असे असताना त्याची दखल घेण्यात आली, ही बाब याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने संतप्त होऊन कडक शब्दात ताशेरे ओढले.पोलिसांच्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्तदेवळी पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री नाईक यांच्याकडून अनावधानाने ही चूक झाल्याचे सांगितले व या प्रकरणात सक्षम न्यायालयात अदखलपात्र समरी दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. परंतु, त्यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही. ही अनावधानाने झालेली चूक असू शकत नाही. कारण, कायदे व कायदेशीर प्रक्रियेचे मूलभूत प्रशिक्षण दिल्यानंतरच पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली जाते. अशा परिस्थितीतही अनावधानाने चूक झाली असल्यास त्यातून संबंधित पोलीस कर्मचाºयाची असक्षमता दिसून येते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व भविष्यात या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.त्या कॉन्स्टेबलवर एक रुपया दंडया चुकीमुळे शाहू यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना योग्य भरपाई मंजूर करून ती भरपाई ही चूक करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल नाईक यांच्या वेतनातून वसूल करण्याचा विचार न्यायालयाने केला होता. परंतु, या चुकीसाठी पोलीस प्रशिक्षण अभ्यासक्रमातील त्रुटीदेखील कारणीभूत असल्याची बाब लक्षात घेता, न्यायालयाने शाहू यांना लाक्षणिक स्वरूपात केवळ एक रुपया भरपाई मंजूर केली व हा एक रुपया नाईक यांच्या वेतनातून कपात करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. शाहू यांच्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस