शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

43 हजार कोटींचा कोल वॉशरी घोटाळा, ६ कंपन्यांसाठी खनिकर्म महामंडळाने बदलले निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 06:28 IST

लागणाऱ्या क्षमतेत बदल : कोळसा धुण्याचे काम एका कंपनीऐेवजी कंपन्यांच्या समूहाला

सोपान पांढरीपांडे

नागपूर : केवळ दोन बड्या कोल वॉशरी कंपन्या व त्यांच्या चार सहयोगी कंपन्यांनाच २२ दशलक्ष टन कोळसा धुण्याचे कंत्राट पुढील १० वर्षे मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने कंत्राटाचे चार मुख्य पात्रता निकष बदलले आहेत. विशेष म्हणजे २०१२ पूर्वी महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी (महाजेन्को) हे काम करत होती. ते आता खनिकर्म महामंडळाकडे काहीही कारण नसताना का आले? हा मोठा गंभीर प्रश्न आहे.

काय आहे घोटाळा ?आॅगस्ट २०१९ मध्ये खनिकर्म महामंडळाने छत्तीसगढ, ओडिशा व महाराष्ट्रातील खाणीमधून महाजेन्कोला जो २२ दशलक्ष टन कोळसा मिळतो, तो धुण्यासाठी निविदा मागवल्या. या भरण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर व उघडण्याची तारीख ९ सप्टेंबर होती. निवडणूक आचार संहिता १२ सप्टेंबर पासून सुरु होण्याची शक्यता लक्षात घेऊन या तारखा निवडल्याचे स्पष्ट आहे. मूळ निविदेच्या पात्रता निकषांमध्ये परत न मिळणारे निविदा शुल्क ५ लाख रुपये होते व अनामत रक्कम एक दशलक्ष टनासाठी ३ कोटी होती. तिसरे म्हणजे किमान दोन दशलक्ष टन कोळसा धुण्याची वार्षिक क्षमता व फक्त एका कंपनीला टेंडर भरण्यासाठी परवानगी होती. परंतु हे चारही पात्रता निकष खनिकर्म महामंडळाने नंतर या सहा कंपन्यांसाठी बदलले. परत न मिळणारे निविदा शुल्क ५ लाखावरून एक लाख रुपये, अनामत रक्कम दहापट कमी म्हणजे एक दशलक्ष टनासाठी ३ कोटी वरून ३० लाख करण्यात आली. कोळसा धुण्याची वार्षिक क्षमता २ दशलक्ष टनावरून एक दशलक्ष टन झाली. एका कंपनी ऐवजी आता अनेक कंपन्यांच्या समूहाला (कॉन्शार्शियम) निविदा भरण्याची परवानगी देण्यात आली. हे निकष बदलल्यामळे दोन बलाढ्य वॉशरी कंपन्या गुरुग्रामी आर्यन कोल बेनिफिशीएशनइंडिया (एसीबी इंडिया) व कोलकात्याची हिंद एनर्जी अँड कोल बेनिफिशीएशन इंडिया (हिंद एनर्जी) या दोन कंपन्यांना व त्यांच्या चार सहयोगी कंपन्यांना हे कंत्राट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. एसीबी इंडियाच्या सहयोगी कंपन्या दिल्लीच्या कार्तिकेय कोल वॉशरीज व ग्लोबल कोल अँड मागविंग या आहेत. तर हिंद एनर्जीच्या सहयोगी कंपन्या बिलासपूरच्या क्लीन कोल एंटरप्रायझेस व हिंद महामिनरल या आहेत. या कंपन्या महाजेन्कोसहित ओडिशा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश व झारखंड मधील राज्य विद्युत कंपन्यांसाठी कोळसा धुण्याचे काम करत असतात.एसीबी इंडियाची क्षमता ६५ दशलक्ष टन, हिंद एनर्जीची १५ दशलक्ष टन तर सहयोगी कंपन्यांची क्षमता २० दशलक्ष टन म्हणजे एकूण १०० दशलक्ष टन एवढी आहे. कोल इंडियाचे वार्षिक कोळसा उत्पादन ५०० ते ५५० दशलक्ष टन आहे. त्याच्या २० टक्के ही क्षमता आहे, कोळसा धुण्याचा दर ४३० रुपये प्रतिटन देण्यात आला आहे. त्यामुळे हा घोटाळा ४३००० कोटींचा असू शकतो व तो १० वर्षांपर्यंत सुरु राहू शकतो. विशेष म्हणजे ४३० रु. प्रतिटन हा दर सर्वप्रथम गुजरातने निश्चित केला. तो महाजेन्को सारख्या भारतातील सर्वात मोठ्या वीज निर्मीती कंपनीने स्वीकारल्यामुळे इतर राज्यातील विज निर्मीती कंपन्या तो आपोआपच स्वीकारतील म्हणून हा दर ठरला आहे. खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल व महाव्यवस्थापक प्रेमराज टेंभरे या दोघांनीही पात्रता निकष बदलण्याचे अमान्य केले. महाजेन्कोने कोळसा, व्यवस्थित व नियमित मिळावा म्हणून खनिकर्म महामंडळाची नोडल एजंसी म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे पात्रता निकष बदलण्याचा आम्हाला अधिकार आहे. असे प्रत्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाने यावरील याचिकेच्या निकालात म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले.

महाजेन्कोचे कोळसा विभागाचे कार्यकारी संचालक आर. पी. बुरडे यांनी यापूर्वीही महाजेन्कोने खासगी कंपन्यांना कोळसा हाताळण्याचे काम दिले होते त्यामुळे खनिकर्म महामंडळाला नोडल एजंसी नेमण्यात काही गैर नाही, असे सांगितले. परंतु मुळात महाजेन्कोनेच ही निविदा का काढली नाही या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.असे बदलले निकष

पूर्वी आतानिविदा शुल्क ५ लाख १ लाखअनामत रक्कम ३ कोटी १ कोटीवॉशरी क्षमता २ द.ल.टन १ द.ल.टनकंपनी पात्रता १/२ कंपन्या कितीहीकंपन्यांचासमूहमहाजेन्कोचे कोळसा विभागाचे कार्यकारी संचालक आर. पी. बुरडे यांनी यापूर्वीही महाजेन्कोने खासगी कंपन्यांना कोळसा हाताळण्याचे काम दिले होते त्यामुळे खनिकर्म महामंडळाला नोडल एजंसी नेमण्यात काही गैर नाही, असे सांगितले. 

 

टॅग्स :nagpurनागपूरCoal Allocation Scamकोळसा खाण घोटाळा