कोळसा चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:32+5:302021-01-19T04:10:32+5:30
अजय अमरसिंह राजगिरे (४०) असे आरोपीचे नाव आहे. अजय शिताफीने सॅम्पल कलेक्शनच्या नावाखाली डुमरी खुर्द रेल्वे सायडिंग येथून कोळसा ...

कोळसा चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ()
अजय अमरसिंह राजगिरे (४०) असे आरोपीचे नाव आहे. अजय शिताफीने सॅम्पल कलेक्शनच्या नावाखाली डुमरी खुर्द रेल्वे सायडिंग येथून कोळसा चोरी करीत होता. हा कोळसा तो बाहेर विकत होता. इतवारी रेल्वे सुरक्षा दलाला अजय कोळसा चोरी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी आरपीएफने जाळे टाकले. इतवारीचे निरीक्षक आर. के. सिंह, उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन, ओ. एस. चौहान, ईशांत दीक्षित यांनी रेल्वे सायडिंगवर गस्त लावली. थोड्या वेळानंतर एक युवक आपल्या विनाक्रमांकाच्या वाहनावर चार पोते घेऊन जाताना दिसला. त्याचा पाठलाग करून त्यास स्टेशन इमारतीच्या मागे पकडण्यात आले. त्याच्या जवळून कोळसा आणि २ लोखंडाच्या पेड्रल क्लिप जप्त करण्यात आल्या. आपण डुमरी सायडिंग येथून कोळशाचे सॅम्पल घेत असल्याचे त्याने सांगितले. परंतु या कामाच्या परवान्याबाबत पत्र मागितले असता त्याने ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून १३०० रुपयांचा २०० किलो कोळसा, क्लिप आणि बाइकसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.