हमसफर स्पेशलचे कोच, शौचालयात घाणीचे साम्राज्य ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:40+5:302021-01-19T04:09:40+5:30
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्यात येत आहे. मात्र रेल्वेगाड्यातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे प्रवाशांना ...

हमसफर स्पेशलचे कोच, शौचालयात घाणीचे साम्राज्य ()
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्यात येत आहे. मात्र रेल्वेगाड्यातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून अधिक रक्कम वसूल करीत आहे. परंतु या गाड्यांच्या स्वच्छतेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी दानापूर-सिकंदराबाद हमसफर एक्स्प्रेसमधील डस्टबीनमध्ये कचरा साचला होता. कोच आणि शौचालयात घाण पसरली होती. शौचालयात पाणीही उपलब्ध नव्हते. अतिरिक्त रक्कम देऊनही प्रवाशांची नाहक गैरसाेय झाली असल्याचे या गाडीत बी-८ कोचमध्ये बर्थ क्रमांक ३३, ३६ वरून आपल्या पत्नीसोबत प्रवास करणारे सीताबर्डी येथील रहिवासी राजेश तिवारी यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे असताना रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत नसल्याचेही ते म्हणाले. नागपूरवरून सुटल्यानंतर ही गाडीही चार तास उशिराने धावत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.