जात प्रमाणपत्राचा वाद मुख्यमंत्री घेणार बैठक
By Admin | Updated: March 16, 2015 02:13 IST2015-03-16T02:13:12+5:302015-03-16T02:13:12+5:30
महसूल आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या वादात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे काम ठप्प पडल्याने ...

जात प्रमाणपत्राचा वाद मुख्यमंत्री घेणार बैठक
नागपूर : महसूल आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या वादात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे काम ठप्प पडल्याने यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक बोलाविली आहे. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांनी याला दुजोरा दिला आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष कोण असावा यावर सध्या महसूल आणि सामाजिक न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद आहे. अध्यक्षपद आपल्यालाच मिळावे यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्राच्या कामावर बहिष्कार घातला.त्यामुळे एक सध्या हे काम ठप्प आहे. परिणामी प्रमाणपत्रासाठी आलेले अर्ज प्रलंबित आहेत. त्याच प्रमाणे जात पडताळणी प्रमाणपत्राचेही अनेक अर्ज पडून आहे. जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीवर परिणाम होणार आहे. त्याच प्रमाणे वैधता प्रमाणपत्राअभावी नोकऱ्याही जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बैठक बोलाविली आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी याला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या वादात विद्यार्थी भरडले जात आहे. दोन्ही विभागांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)