शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘सीएम’कडून मदतीचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:49 IST

मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१६ पासून तीन वर्षांत मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी थोडीथोडकी नव्हे तर ४८९ कोटींहून अधिक रकमेची मदत करण्यात आली. विशेषत: दरवर्षी येणारे अर्ज व मंजूर अर्थसाहाय्य यांचा आकडा वाढत जातोय. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री साहाय्यता निधीतून तीन वर्षांत ४८९ कोटींहून अधिकची मदतदानदात्यांचादेखील विश्वास वाढीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१६ पासून तीन वर्षांत मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी थोडीथोडकी नव्हे तर ४८९ कोटींहून अधिक रकमेची मदत करण्यात आली. विशेषत: दरवर्षी येणारे अर्ज व मंजूर अर्थसाहाय्य यांचा आकडा वाढत जातोय. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मुख्यमंत्री सचिवालयाकडे विचारणा केली होती. २०१६ सालापासून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किती रुपयांची मदत झाली, किती नागरिकांचे अर्ज आले, यातील किती रुग्ण होते तसेच नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या पुनर्वसनासाठी किती मदत करण्यात आली, इत्यादी प्रश्न माहितीच्या अधिकारांतर्गत विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ७४ हजार १३८ नागरिकांचे अर्ज आले. यातील ४८ हजार ४५७ अर्ज मंजूर झाले. २०१६ साली १५ हजार ५६६ अर्ज आले होते. २०१७ साली हा आकडा २३ हजार ७५३ इतका होता, तर २०१८ मध्ये ३४ हजार ८१९ जणांनी अर्ज केले. या सर्वांना मिळून ४८९ कोटी ४९ लाख ७४ हजार ९९४ रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. १५ हजार ३१९ जणांचे अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आले.दानदात्यांकडून मदतीचा ओघ वाढलामुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या बँक खात्यात दानदात्यांकडूनदेखील मदतीचा ओघ वाढला. साहाय्यता निधीत १० लाखाहून अधिक रक्कम देणगी म्हणून देणाऱ्यांची तीन वर्षांतील संख्या ही ३६९ इतकी होती. त्यांच्याकडून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत ७७ कोटी ४१ लाख ९० हजार ६९२ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधीRight to Information actमाहिती अधिकार