शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्यासारखे गोविंद बागेत गेलो नाही; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 05:52 IST

‘हिऱ्यापोटी गारगोटी’ अशी म्हण असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता प्रहार केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क   

नागपूर: प्रबोधनकारांनी अंधश्रद्धा,  कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, त्याच प्रबोधनकारांचे वारसदार लिंबू फिरवण्याची भाषा करू लागले आहेत. या लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका करतानाच ‘हिऱ्यापोटी गारगोटी’ अशी म्हण असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता प्रहार केले. 

रेशीमबागेत गेलो म्हणून मला हिणवले, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम करतो आहे, त्यामुळे रेशीमबागेत गेलो, तुमच्यासारखे गोविंदबागेत गेलो नाही, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांंना अप्रत्यक्षरीत्या लगावला.  

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा   

विधानसभेत राजकीय भाषण होत नाही; पण तुम्ही सारखे तेच सांगत आहात. सहा महिन्यांपूर्वी काय घडले हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तुम्ही त्यातून बाहेर या, आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात, असल्या छोट्या-छोट्या गोष्टींत मन रमवू नका. तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांना जास्त टार्गेट करत आहात. मुले म्हणून सोडून द्या, तुमच्या  प्रवक्त्यांना बाहेर बोलायला सांगा, सभागृहात ते सांगू नका, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

सरकारला सहा महिने पूर्ण

सरकार स्थापन झाले त्याला शुक्रवारी सहा महिने पूर्ण झाले. तो धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार पूर्ण कालावधी भक्कमपणे पूर्ण करील; तसेच येणाऱ्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती बहुमताने जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.  

अजित पवारांना टोला 

मनात असूनही सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना आपण मोकळेपणाने दाद दिली नाही, हे मला जाणवले. तुमच्यावर महाविकास आघाडीचा दबाव असू शकतो, हे मी समजू शकतो. आपण माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत बसलात. ते करण्यापेक्षा घेतलेले निर्णय मोजले असते तर बरे वाटले असते, असा टोला शिंदेंनी अजित पवारांना लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे