शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

मॅजिक! इकडचे कटआऊट तिकडे अन् तिकडचे इकडे

By शताली शेडमाके | Updated: December 29, 2022 12:07 IST

आपलाच नेता मोठा हे दाखविण्याची चढाओढ

नागपूर : नागपुरात गेल्या दोन आठवड्यांपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधकांमधील तू तू- मै मै,आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगेलच तापले आहे. विधान भवनाच्या प्रवेशाद्वारासमोर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सकडे पाहून विशेष काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यातली खरी गंमत आहे ती या 'कटआऊट्स'च्या अदलाबदली व उंचीची. 

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात १९ डिसेंबरपासून सुरू झाले. यावेळी शहरभरात ठिकठिकाणी अनेक नेते, मंत्री, पक्षाचे पोस्टर फ्लेक्स लागले आहेत. प्रत्येकजण पोस्टर, बॅनर, फ्लेक्समधून आपल्या पक्षाचे, नेत्याचे स्वागत करतानाचे चित्र पहायला मिळाले. 

विधान भवनासमोरील इमारतीजवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. काल २८ तारखेला मुखमंत्री शिंदे यांचा व त्या बाजुला उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा कटआऊट लागलेला होता. परंतु, आज २९ तारखेला या पोस्टर्सची अदलाबदली झालेली दिसून आली. यावेळी फडणवीस यांचा पोस्टर आधी व शिंदेंचा पोस्टर नंतर असा क्रमबदल दिसून आला. शिवाय उपमुख्यमंत्र्यांची 'उंची' कमी करत मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलवर आणण्यात आली. हे पाहताना आपला नेता किती मोठा हा दाखविण्याचा प्रयत्न यातून करण्यात आल्याचे यातून दिसून येत आहे. 

महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार सत्तेवर आले. यानंतर या जोडीची, त्यांच्या कामकाजाची चर्चा सातत्याने होतच असते. परंतु, हे पाहताना शिंदे गट व भाजप कार्यकर्त्यांमध्ये कोण मोठं? आपलाच नेता मोठा, अशी चढाओढ तर सुरू नाहीये ना, असं काहीसं चित्र दिसून येत आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आता या पोस्टर्सचे पुढे काय होते. बदललेला क्रम हा पूर्वस्थितीत दिसेल, तसाच राहील की आणखी काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

टॅग्स :PoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपाShiv Senaशिवसेना