स्मार्ट सिटीवर गोंधळ

By Admin | Updated: February 13, 2016 02:55 IST2016-02-13T02:55:34+5:302016-02-13T02:55:34+5:30

स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या २० शहरात उपराजधानीचा समावेश होईल, असा विश्वास शहरातील जनतेला होता.

Clutter on Smart City | स्मार्ट सिटीवर गोंधळ

स्मार्ट सिटीवर गोंधळ

मनपा सभागृह : चर्चा नाकारल्याने विरोधकांचा बहिष्कार
नागपूर : स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या २० शहरात उपराजधानीचा समावेश होईल, असा विश्वास शहरातील जनतेला होता. परंतु केंद्र सरकारने नागपूरचा समावेश केला नाही.
आपण कुठे कमी पडलो, याची माहिती सदस्यांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली. परंतु महापौर प्रवीण दटके यांनी चर्चा नाकारल्याने विरोधी सदस्य जोरदार नारेबाजी करीत वेलमध्ये आले व त्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला.
स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूरचा समावेश व्हावा, अशी शहरातील नागरिकांची इच्छा आहे. परंतु तो का झाला नाही, याची माहिती जाणून घेण्यासाठी शहरातील नागरिकांना उत्सुकता आहे.
महापालिका कुठे कमी पडली त्यामुळे यावर चर्चा व्हावी अशी मागणी ठाकरे व प्रफुल्ल गुडधे यांनी केली. सभागृहाच्या कामकाजात स्मार्ट सिटीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील सभागृहात या विषयाचा चर्चेसाठी समावेश करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील.
यावर विस्तृत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दटके यांनी दिले. परंतु यावर विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. वेळ असल्याने आताच चर्चा घ्या, अशी मागणी करीत सदस्य कॉंग्रेस वेलमध्ये आले जोरदार नारेबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. (प्रतिनिधी)

रीतसर नोटीस द्यावी
सत्तापक्षाची सभागृहात कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावर चर्चेची आमची तयारी आहे. स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूर राज्यात तिसऱ्या तर देशभरात ३१ व्या स्थानावर आहे. महापालिका कायद्यानुसार सदस्यांना नोटीस देऊ न चर्चा उपस्थित करता येते. त्यानुसार विरोधीपक्षाने नोटीस देण्याची गरज होती. पुढील सभागृहात विरोधी सदस्यांनी नोटीस दिली नाही, तरीही या विषयावर चर्चा करू.
प्रवीण दटके, महापौर

विकास शुल्क व कर किती वाढणार?
स्मार्ट सिटीत नागपूरचा समावेश व्हावा, अशी जनतेची इच्छा आहे. सभागृहात महत्त्वाचे विषय संपले होते. वेळ असल्याने या महत्त्वाच्या विषयावर चर्चेची मागणी केली. चर्चेतून नागपूरचा स्मार्ट सिटीत नंबर का लागला नाही, केंद्राकडे परत प्रस्ताव पाठविणार का, यामुळे शहरातील जनतेवर वाढीव कर व विकास शुल्काचा किती बोजा पडणार याची जनतेलाही माहिती झाली असती. महापौरांच्या मनात असते, तर चर्चा करता आली असती. विरोधक म्हणून आमची भूमिका मांडली. आता पुढील सभेत चर्चा घडवून आणू. तसेच १६ फेब्रुवारीला मनपातील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी या मुद्यावरून महापालिका कार्यालयापुढे आंदोलन करू
विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते, महापालिका

Web Title: Clutter on Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.