आकाशात ढग, पारा चढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:14+5:302020-12-12T04:27:14+5:30
नागपूर : शहराच्या आकाशात ढग दाटले असल्याने तापमानात घसरण हाेत असल्याचे दिसून येत आहे. कमाल व किमान तापमानात सामान्यपेक्षा ...

आकाशात ढग, पारा चढला
नागपूर : शहराच्या आकाशात ढग दाटले असल्याने तापमानात घसरण हाेत असल्याचे दिसून येत आहे. कमाल व किमान तापमानात सामान्यपेक्षा अडीच डिग्री सेल्सिअसने वाढ झाली असून थंडीचा प्रभाव कमी व्हायला लागला आहे. अरबी समुद्राची आर्द्रता आणि वेस्टर्न डिस्टरबन्समुळे मध्य भारताच्या आकाशात आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्यामुळेच आकाशातही ढग दाटले आहेत.
हवामान विभागानुसार वेस्टर्न डिस्टरबन्समुळे अफगाणिस्तानात सायक्लोनिक वेस्टर्न तयार झाले आहे. त्यामुळे अरबी समुद्राची आर्द्रता मध्य भारतात प्रवेश करीत आहे. यासाेबत उत्तर-मध्य प्रदेशात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. वातावरणात हाेणाऱ्या बदलांमुळे विदर्भात १३ ते १५ डिसेंबरदरम्यान थाेडा पाऊस हाेण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच तापमान वाढायला लागले आहे.
नागपूर शहरात सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान आर्द्रता ६१ टक्के हाेती तर सायंकाळी ५.३० वाजता ती ५१ टक्के नाेंदविण्यात आली. दिवसाचे तापमान ३१.४ अंश आणि रात्रीचे किमान तापमान १५.४ अंश हाेते. यामुळेच थंडीचा प्रभाव जाणवला नाही. थंड वारे वाहण्याचे प्रमाणही थांबल्याचे दिसून येत आहे. १४ डिग्री सेल्सियस तापमानासह गाेंदियात सर्वात कमी तापमान नाेंदविण्यात आले. दुसरीकडे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात तापमान वाढ झाल्याचे नाेंदविण्यात आले.